मकरंद जाधव तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
हिंदवी स्वराज्य संस्थापक, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. तालुक्यातील बोर्लीपंचतन येथे श्री शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकाला गावातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक हनुमंत शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार घालुन आभिवादन करण्यात आलं.यावेळी श्रीवर्धन येथील चँपीयन कराटे क्लबच्या विद्यार्थ्यांनी शिवकालील युध्द कलेचं प्रात्याक्षीक सादर करुन वातावरण शिवमय केलं. वडवली गावातून दुचाकी स्वारांच्या ताफ्यात जय भवानी,जय शिवाजीच्या घोषणांत निघालेल्या शिवरथाचे गोंडघर,शिस्ते,कापोली, दिवेआगर,बोर्लीपंचतन या गावांनी स्वागत करुन पुजन केलं. शिवरथाची सांगता वडवली येथे प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश चौलकर यांच्या हस्ते करण्यात आली.या शिवजयंती सोहळ्याला पाच गावातील शिवप्रेमींचं लाभलेल्या सहकार्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात आलं.