हर्षवर्धन पाटील यांच्या घरासमोर मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन
विजयकुमार गायकवाड तालुका प्रतिनिधी इंदापूर इंदापूर : राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील भाग्यश्री निवासस्थानासमोर सोमवार ( ता.१९) रोजी मराठा समाजाच्या युवकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत मराठा आरक्षण मिळावे यासाठी मागणी केली. प्रसंगी हर्षवर्धन पाटील यांनी आंदोलकांची भेट घेत मराठा आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी आपला पाठिंबा दर्शवला तसेच धनगर समाज, लिंगायत समाज व ज्या समाजाच्या आरक्षणात बद्दल मागणी आहे, त्यांना आरक्षण मिळावे यासाठी पाठिंबा दिला व मागणी केली. मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासोबत बोलणं झाल्याचेही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.यावेळी हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील व कन्या भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे यांनी सर्व आंदोलकांचे औक्षण करत स्वागत केले. असे स्वागत केल्यामुळे काही आंदोलक भावूक झालेले पाहायला मिळाले.


