कैलास शेंडे
तळोदा तालुका प्रतिनिधी
तळोदा- ग्राहकांनी ऑनलाइन मार्केटिंग च्या नादात पडून स्वतःची फसवणूक करण्यापेक्षा स्थानिक बाजारपेठेतूनच खरेदी करून आपली फसवणूक टाळावी व दक्षता घ्यावी असा सल्ला आज ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात पो नि राहुल पवार यांनी दिला आज तळोदा येथील प्रशासकीय संकुलात अखिल भारतीय ग्राहक पंचायत व पुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राहक दिन साजरा करण्यात आला या वेळी सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी ज्योती गुंजाळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्षा वंदना तोरवणे जिल्हा सदस्य उल्हास मगरे तालुका अध्यक्ष डॉ कीर्ती लोखंडे उपाध्यक्ष भगवान माळी संघटक कैलास शेंडे अन्न व औषध प्रशासन सहा.आयुक्त अश्विनी जमदग्नी नायब तहसीलदार निशा नाईक ग्राहक पंचायत महाराष्ट्चे नाशिक विभागीय सहसचिव श्रीकांत पाठक जिल्हाध्यक्ष रमेश मगरे जिल्हा सचिव ए डी सूर्यवंशी तालुका सचिव रमेश भाट संघटक प्रमोद वाणी तालुका कृषी अधिकारी मीनाक्षी वळवी इ
व्यासपीठावर उपस्थित होते.ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली जिल्हा सदस्य उल्हास मगरे यांनी ग्राहकांनी फक्त आपले हक्क अधिकार गाजवायचे नसून आपले कर्तव्य सुद्धा पार पाडावीत ग्राहक म्हणून सर्वांनी पर्यावरणाची काळजी घेणे आपले कर्तव्य आहे. तळोदा तालुक्यात दुधाची उपलब्धता व वाटप यात मोठी तफावत असल्याने भेसळ मोठ्या प्रमाणात होत आहे.तरी याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून मिठाई दुकानदार व दुध विक्रेते यांचेवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी या वेळी त्यांनी केली ग्राहक म्हणून कर भरताना ज्या बाबतीत आपण कर भरतो ती बाब आपल्याला उपलब्ध झाली आहे किंवा नाही हे तपासून घ्यावी व ग्राहकांची फसवणूक झाली तर आवश्यक असलेले हेल्पलाईन क्रमांक जिल्हाध्यक्ष वंदना तोरवणे यांनी सांगितले . राजाराम राणे यांनी ग्राहकांच्या चार हक्का विषयी यथोचित माहिती दिली. त्याचबरोबर प्रत्येकाने आपण फसविले गेल्यास न्याय मिळवण्यासाठी योग्य ती तक्रार ग्राहक मंचाकडे करावी विनंती देखील यावेळी केली. या कार्यक्रमाला न्यू हायस्कूल येथील विद्यार्थिनी मालीनी सुनील वाघ हिने आपल्या मनोगतातून सुपर मार्केट मधील नुकसानी बाबत तसेच फसव्या लिंक बाबत व फसव्या जाहिरातींबाबत या आपलं मनोगत व्यक्त केलं.
तहसील कार्यलयाकडून विद्यार्थी ग्राहक जागृती साठी परिसरातील शाळा कॉलेजेस मध्ये घेतलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष अक्रम पिंजारी, ऍड.अल्पेश जैन,किरण गॅस एजन्सी चे किरण पवार, विद्युत वितरण, सहा.निबंधक कार्यालयाचे प्रतिनिधी,अखिल भारतीय ग्राहक मंचचे कोषाध्यक्ष भिका चव्हाण, सहकोषाध्यक्ष रोशनी पाडवी ,सहसचिव दीपक गोसावी ,सह संघटक डॉ.जगदीश पाटील सदस्य अकील अन्सारी,शर्मिला माळी सहयोग सोशल ग्रुप चे ऍड अल्पेश जैन शिक्षक प्रा जयेश मगरे प्रकाश वानखेडे वैशाली पवार प्रमोद सोनवणे व रेशन दुकानदार पालिका कर्मचारी नागरिक ग्राहक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हेमंत सूर्यवंशी यांनी मानले.
“तळोदा येथे साजरा करण्यात आलेला ग्राहक दिन हा जिल्हास्तरीय कार्यक्रम होता तरी अनेक उच्च अधिकाऱ्यांनी या कार्यक्रमाला दांडी मारत आपले कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवले होते त्या मुळे कार्यक्रमात उपस्थित प्रश्नांना समर्पक उत्तरे मिळाली नाहीत म्हणून जिल्हाधिकारी,जिल्हा पुरवठा अधिकारी ,प्रांत अधिकारी,तहसीलदार यांच्या अनुपस्थिती बद्दल कार्यक्रमात जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली.”