अनंत कराड
तालुका प्रतिनिधी पाथर्डी
पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी येथे शिरसाटवाडी येथील अमोल जनार्दन शिरसाठ यांची अग्निशामन दलात निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. अतिशय जिद्द चिकाटीच्या जोरावर प्रयत्न केल्याच्या नंतर यश मिळतेच असेच प्रयत्न सर्व तरुण वर्गाने करावे. निवडीच्या निमित्ताने शिरसाटवाडी ग्रामस्थांच्या वतीने अमोल शिरसाट यांचा सन्मान करण्यात आला यावेळी अहमदनगर जिल्हा परिषदेचे समाज कल्याण समितीचे माजी सभापती अर्जुनराव शिरसाठ अनंतराज कराड जनार्दन शिरसाठ आसाराम शिरसाठ माऊली कोंगे मोहन शिरसाट सर व अनेक मान्यवर मंडळी व ग्रामस्थ मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.











