प्रकाश नाईक
तालुका प्रतिनिधी अक्कलकुवा
अक्कलकुवा :- राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीचे मंजूर केलेल्या विकास कामांना विद्यमान सरकारने स्थगिती होती. नंदुरबार जिल्ह्यातील कामांना तात्कालीन पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी स्थगिती दिलेल्या अक्राणी. अक्कलकुवा तालुक्यातील महत्वाचे रस्त्यांचे कामे रखडली होती. या स्थगितीच्यां विरोधात आमदार ऍड के.सी. पाडवी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत विकास कामाचा मार्ग मोकळा केला होता. माजी आमदार के. सी. पाडवी यांच्या प्रयत्नाला मोठे यश आल्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघात विकास कामाचा धडाका सुरू केला आहेत. दि. 30 नोव्हेंबर 2023 रोजी माजी. आमदार के. सी. पाडवी यांच्या उपस्थितीत अक्राणी तालुकातील शिरसाने वावी निगदीं गोरंबा या रस्त्यांचे मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत भूमिपूजन करण्यात आले. त्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत रस्ते अंतर्गत वाघदेव मंदिर ते सिचलाबारी पाटील पाडा रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. त्यासोबत तलावडी रस्ता बांधकाम भूमिपूजन करण्यात आले. आमदार पाडवी यांच्या हस्ते अक्राणी तालुक्यातील विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात येत आहेत. कामाचा धडाका सुरू झाल्याने या भागातील रस्त्यांच्या विकासाचा प्रश्न सुटणार आहे असेही मा. आमदार के. सी. पाडवी यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला गोवाल पाडवी, माजी. सभापती विजयाताई पावरा, जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी, गिताताई पाडवी, निर्मलाताई राऊत, जान्या पाडवी, विक्रम पाडवी, हारसिंग पावरा, हेमा पराडके, सुरेश पाडवी, पंचायत समिती सदस्य विलास पाडवी, सुखदेव पावरा, मयचा गुरुजी, पोपट वसावे, यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूमिपूजन कार्यक्रमानंतर परिसरातील नागरिकांना कार्यकर्त्याची आमदार पडवी यांनी नागरिकांची प्रत्यक्ष संवाद साधला आणि आपल्या भागात विकासाच्या कामाला ब्रेक लावण्यासाठी सत्ताधारी नेत्यांनी कशाप्रकारे प्रयत्न केला होता, आणि अक्राणी अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातील कामांना कशा प्रकारे स्थगिती दिली, आणि या स्थंगितीच्या
विरोधात न्यायालयीन लढाई लढून या परिसराच्या विकासासाठी रखडलेले निधी परत आणल्याचा पाडवी यांनी सांगितले. परिसराच्या विकासासाठी कोटिबद्द असून विरोधकांना कितीही अडचणी आणल्या तरी त्यावर मात करत या भागांचे रस्त्याचे प्रश्न सोडवण्याचे काम मार्गी लागल्याचे त्यांनी सांगितले यावेळी उपस्थित मान्यवरांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले होते.








