कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
वंचित बहुजन आघाडी तर्फे सम्यकचा सत्कार व पुढील कार्यास शुभेच्छा २० व्या राष्ट्रीय सिप अबॅकस परीक्षा हैदराबाद येथे झालेल्या ऑल इंडिया नॅशनल लेव्हल अबॅकस च्या दुसऱ्या लेवल मध्ये, सम्यक राजपाल सावतकर हा संपूर्ण भारतातून चॅम्पियन विजेता ठरला आहे.महावीर नगर पुसद जिल्हा यवतमाळ येथे राहणारे मध्यमवर्गीय कुटुंबीय आहेत राजपाल सावतकर यांचे चिरंजीव सम्यक सावतकर आहेत त्यांनी हैदराबाद येथे झालेल्या नॅशनल लेवल अबॅकस च्या परीक्षेमध्ये भाग घेऊन लेव्हल 2 मध्ये संपूर्ण भारतातीतून आलेल्या विद्यार्थ्यांमधून विजेता ठरला आहे.ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याची
माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीचे पुसद तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव व त्यांचे सहकारी यांनी सावतकार कुटुंबीय यांची भेट घेऊन सम्यक चा संपूर्ण भारतातून विजेता ठरल्यामुळे सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.सम्यक सावतकर यांचे वडील राजपाल सावतकर हे मोटर मेकॅनिकचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदर निर्वाह करतात सम्यक हा सर्वसाधारण कुटुंबातील आहे पुसद येथील सेंटमेरी स्कूल चा इयत्ता सहावीचा विद्यार्थी असून सम्यक ला पुढील शिक्षणासाठी कोणत्याही अडचणी येऊ नये
करिता कौटुंबिक भेट घेण्यात आली. तसेच सम्यक यांनी मिळवलेल्या यशाबद्दल आई-वडिलांचे ही भरभरून अभिनंदन केले.तसेच आम्ही आपल्या सोबत असल्याचा विश्वास समस्त कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.यावेळी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, शहराध्यक्ष जयानंद उबाळे, रिपब्लिकन वार्ताचे पत्रकार विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, तालुका उपाध्यक्ष कृष्णा दोडके,शहर उपाध्यक्ष राजरत्न लोखंडे, शहर संघटक मधुकर सोनवणे, शहर महासचिव डॉक्टर अरुण राऊत, भगवान बर्डे सर, ज्ञानेश्वर मेटकर आदी पदाधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.






