शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू : सेलू शहरातील नूतन महाविद्यालय मैदान परिसरात होणाऱ्या मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटिल यांच्या सभेसाठी नियोजन बैठक आज दिनांक 29 नोव्हेंबर बुधवार रोजी संध्याकाळी पाच वाजता सेलू शहरातील साई बाबा मंदिरात संपन्न झाली. या नियोजन बैठकीत जिल्ह्यातून तसेच इतर तालुक्यातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत त्यामुळे त्यांच्या वाहनांची पार्किंगची व्यवस्था,त्याचबरोबर शहरातील वाहतूक,पिण्याच्या पाणी पुरवठा, बैठक व्यवस्था, आदी विषयावर चर्चा संपन्न झाली या बैठकीला परभणी जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती अशोक नाना काकडे, प्रसाद महाराज काष्टे,माजी नगराध्यक्ष पवन आढळकर, संदीप लहाने, रंजीत तात्या गजमल, रवींद्र डासाळकर, छगन शेरे, माऊली ताठे,जयसिंग शेळके, राम मैफळ सह सेलू शहरासह तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.