प्रकाश केदारे
तालुका प्रतिनिधी पाथरी
आज दि.२९ नोव्हेंबर रोजी जालना येथील गांधी चमन येथे चालू असलेल्या उपोषणास पाथरी येथील सर्व समाज बांधवांच्या वतीने व परशुराम संस्कार सेवा संघ व विश्वव्यापी ब्राह्मण एकता महासंघ तसेच नरेंद्र मोदी विचार मंच व पंचमुखी हनुमान मंदिर सेवाभावी संस्था यांच्या वतीने गांधी चमन येथे दीपक रणवरे हे काल दि.२८ नोव्हेंबर पासून ब्राह्मण समाजास परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळावे व ब्राह्मण समाजाच्या सर्व मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी अमर उपोषण करत आहेत या उपोषणास सर्वच जिल्ह्यातून तालुक्यातून व विविध संघटना, पक्ष, व राजकीय नेत्यांकडून जाहीर पाठिंबा मिळत आहे. हे अमर उपोषण जोपर्यंत सरकार ब्राह्मण समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत हे अमर उपोषण असेच चालू राहील असे यावेळी सांगण्यात आले. ब्राह्मण समाज सध्या खूप अडचणी मध्ये आहे .ब्राह्मण समाजाच्या मागण्या रास्ता असून सरकारने त्या त्वरित मंजूर कराव्यात असे उपोषण करते दीपक रणवरे यांचे मत आहे .दीपक रणनवरे, व धनंजय कुलकर्णी बोलताना म्हणाले की आत्तापर्यंत ब्राह्मण समाजाने विविध आंदोलने उपोषणे सर्व काही केले आहे .मागील काही काळात ब्राह्मण समाजास न्याय देऊ असे आश्वासन पण मागील सरकारमध्येदिले होते. विधानसभेत प्रश्न काही महोदयांनी केले होते. त्यावेळी पण ब्राह्मण समाजाच्या मागण्या मान्य करून त्यांना स्वतंत्र परशुराम आर्थिक विकास महामंडळ देण्याबाबत व समाजाच्या मागण्या मान्य करण्याबाबत विचार करू असे मंत्री महोदयांनी आश्वासन पण दिले होते. गेलेल्या गत अधिवेशनात ब्राह्मण समाजाला काहीतरी मंजूर होईल अशी आशा होती .पण त्या अधिवेशनात इतर समाजांना स्वतंत्र महामंडळे दिली. पण ब्राह्मण समाजाच्या तोंडाला पाणी पुसल्या गेलेव समाजाला गाजर दाखवला अशी प्रतिक्रिया यावेळी उपोषण स्थळी समाज बांधवांनी दिली. आत्तापर्यंत अत्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलने केली उपोषण केली. पण कुठले सरकार ब्राह्मण समाजाचा विचार करत नसल्यामुळे ब्राह्मण समाजास रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे. जर ब्राह्मण समाज पेटून उठला तर याला जबाबदार सरकारच राहील असे यावेळी समाज बांधवांच्या प्रतिक्रिये मधून कळून चुकले. जर सरकारने ब्राह्मण समाजाच्या मागण्या मान्य नाही केल्या तर प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात उपोषणे व आंदोलन केल्या जाईल असे यावेळी धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले पाथरी येथून दीपक रणनवरे हे करीत असलेल्या अमर उपोषणास जाहीर पाठिंबा देण्यासाठी पाथरी येथून परशुराम संस्कार सेवा संघाचे महाराष्ट्र संघटक प्रकाश केदारे, वैभव मुळे, अशोक जोशी, विष्णू पाथरीकर, नितीन पाटील, दीपक दडके, बालू दडके, मकरंद पाठक, मनोज केदारे, प्रवीण पाठक, चिटणीस, डावरे, आलोक चौधरी, प्रवीण जोशी, विजू गाजरे, गणेश गाजरे, योगेश बिडकर, व इतर समाज बांधव होते.