संजय भोसले
तालुका प्रतिनिधी ,कणकवली.
विकसित भारत संकल्प यात्रा कणकवली तालुक्यातील कासार्डे ग्रामपंचायत कार्यालय येथे आली असता या यात्रेचे जोरतदार स्वागत कासार्डे वासियांकडून करण्यात आले. या यात्रेदरम्यान आतापर्यंत लाभ मिळाला नाही अशा नागरिकांपर्यंत पोहचणे, माहितीचा प्रसार व योजनेबद्दल माहिती, नागरिकांशी संवाद,अनुभव तसेच या लाभार्थीच्या नोंदणी करणे याबाबत माहिती देण्यात आली. या अभियान मोहिमेच्या अंतर्गत १५ नोव्हेंबर ते २६ जानेवारी कालावधीत होणार आहे .या कार्यक्रमाला उपस्थित माजी पं.स. सदस्य प्रकाश पारकर, माजी सरपंच संतोष पारकर,सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, ग्रामविकास अधिकारी गजानन कोलते, कृषी विज्ञान केंद्र किर्लोस अधिकारी बाळकृष्ण गावडे, अंगणवाडी पर्यवेक्षिका स्नेहा कांबळी, आरोग्य अधिकारी डॉ सिद्धी पालांडे, सामाजिक कार्यकर्ते संजय पाताडे, खरेदी विक्री संघाचे संचालक श्रीपत पाताडे, सोसायटी चेअरमन दिपक सावंत,दिपक पाताडे,दादा घाडी,श्रीरंग पाताडे, सत्यवान आयरे, केंद्रमुख्याध्यापक दिपक पवार , नानचे सर, ग्रा.पं. सदस्य मिलिंद पाताडे, अभिजित धुमाळ,जयवंती जमदाडे, श्रद्धा शेलार,आरोही जाधव, आरोग्य सेविका धुरे,बंड,तलाठी गोडे , आरेकर संकल्पयात्रा प्रतिनिधी सागर दुतोंडे, बचतगट प्रवर्तक परब,शारदा आंबेरकर आणि अंगणवाडी सेविका, आशा सेविका ग्रामपंचायत सदस्य, कासार्डे ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी प्रकाश पारकर , शेतकरी संघाचे संचालक श्रीपत पाताडे, डॉ सिध्दी पालांडे , अंगणवाडी पर्यवेक्षिका स्नेहा कांबळी , कृषी विज्ञान अधिकारी बाळकृष्ण गावडे ,सरपंच निशा नकाशे यानी मनोगत करीत विविध प्रात्यक्षिके सादर करीत आपला संकल्प विकसित भारत यात्रा मोठया उत्साहात पार पडली.