अनिल वेटे
ग्रामीण प्रतिनिधी केळापूर
करंजी: हवामान विभागाने सांगीतलेल्या अंदाजानुसार अवकाळी पावसाचा व ढगफुटीचा मोठा तडाखा बसल्याने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पांढरकवडा तालुक्यातील अडनी, खातरा ,सोनुर्ली. करंजी मंडळात अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. यवतमाळ तालुक्यातील दि 27 पहाटेपासून विजांचा कडकडाट , मुसळधार पावसाला सुरवात झाली होती. तर अनेक भागातलील विद्युत पुरवठा देखील खंडीत झाला होता. अवकाळी पावसाने करंजी मंडळमधील अडनी, खातारा, सोनुरली, मुंजाळा .सिंगलदीप, ढाईपोळ ,यागावात अवकाळी पावसामुळे गहू , हरभरा, तुर, कापुस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर पांढर सोन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापूस पिकाला अवकाळी पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला आहे. या मंडळामध्ये मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पंचनामा व पाहणीसाठी फिरकले सुद्धा नाहीत तर त्यांना नुकसानग्रस्त शेतकर्यांनी फोन लावले असता त्यांचे मोबाईल स्वीच ऑफ दाखवत होते. याकडे लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही. या करंजी मंडळा मध्ये कर्तव्यदक्ष जिल्हा कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी शेतकर्याची मागणी आहे.