अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मेडशी पासून पश्चिमेस असलेल्या आदिवासींचे तीर्थक्षेत्र भौरद येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त दि 27 नोव्हेंबर रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.ह्या दिवशी सर्व प्रथम श्री भगवान मल्लीकेश्वर पुजनोत्सव निमित्त शोभायात्रा व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असते.या यात्रेमध्ये मोफत आरोग्य शिबिर रबिविली जाते.व त्यामध्ये मोफत औषधी वाटप केली जाते.तसेच ह भ प गजानन शास्त्री पवार यांचा प्रवचन असते.तसेच भक्ती गीत गायन वादक चा कार्यक्रम स्वामी विवेकानंद आश्रम यांच्या वतीने होतो.रात्रीच्या वेळी नवयुवक कला पथक मंडळ ह्यांचा भारुडचा कार्यक्रम असतो. स्वामी विवेकानंद यांचे शिष्य शूकदास महाराज हे त्यांच्या आयुष्यात या गावात येत असत अतिशय दुर्गम भागात घनदाट जंगल वस्तीत आणि आदिवासी बहुल या गावात काही वर्षांपूर्वी आरोग्याच्या कुठल्या सुख सुविधा नव्हत्या. त्यावेळेस शूकदास महाराज हे आपले वैद्यकीय गोळी,दवा,औषधी यांच्यासह या गावात व परिसरात येत आणि तेथील आदिवासी बांधवांना मोफत वैद्यकीय उपचार देत तेव्हापासून येथे कार्तिकी पौर्णिमेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असते.अतिशय निसर्गरम्य वातावरणात हे गाव असून येथे दरवर्षी हजारो परिसरातील भावीक भक्त महाप्रसादाला येतात. त्यामुळे येथे यात्रेचे आयोजन सुद्धा केले जाते.सदर महप्रसाद दरम्यान श्री शास्त्री गजनान महाराज यांनी आपल्या गोडवाणीतून भाविकांना मंत्रमुग्ध केले.या वर्षी या महाप्रसादाला हिवरा आश्रमचे आर बी मालपाणी अध्यक्ष,अशोक थोरहाते उपाध्यक्ष, संतोष गोरे सचिव,आत्मानंद थोरहाते, पुरुषोत्तम अकोटकर, आर डी पवार सर , शिवसाद सांबापुरे, पंढरीनाथ शेळके
यांच्यासह आमदार अमित झनक ह्यांच्या सह प्रदीप तायडे, गजानन शिंदे,शेख जमीर,अनुप संभापुरे, सोहेल पठाण,अजिंक्य मेडशीकर उपस्थित होते.तसेच यात्रेचे व महाप्रसादाचे आयोजन भौरद उत्सव समिती व गावकरी मंडळी मिळून मोठ्या उत्साहात करत असतात. तसेच स्वामी विवेकानंद हिवरा आश्रम यांचे त्यांना मोलाचे सहकार्य असते.तसेच मेडशी पोलिस चौकीचे जमदार निलेश आहीर सह ज्ञानेश्वर सानप ह्यांनी चौख बंदोबस्त यात्रेदरम्यान बजावला.