सिध्दोधन घाटे
जिल्हा प्रतिनिधी बीड
बीड : दि. २६ नोव्हेंबर २०२३ रोजी बीड जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये तथा शासकीय निमशासकीय कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला.
भारत देशातील विविधतेला एकत्रित बांधणाऱ्या आणि लोकशाहीला जीवंत ठेवणारे भारतीय संविधान २६ नोव्हेंबर १९४९ रोजी या देशाला अर्पण करण्यात आले. २६ जानेवारी १९५० या संविधानाची अमंलबजावणी देशात करण्यात आली. भारतीय संविधान हे
भारताचे संविधान हे जगातील सर्वांत मोठे लिखित संविधान आहे. या संविधानामुळेच आज भारत देश एकत्रित आहे. आज रोजी संपूर्ण देशात संविधान दिन साजरा करण्यात आला. बीड जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये तथा शासकीय निमशासकीय कार्यालयात संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. बीड जिल्ह्यातील भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व कार्यालयात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तथा संविधानाच्या उद्दएनशइकएचए वाचन आणि प्रतिज्ञा घेऊन संविधान दिन साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील परळी वैजनाथ, अंबाजोगाई, केज, गेवराई अशा अनेक ठिकाणी भारतीय संविधान निर्माते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन करण्यासाठी लोकांनी गर्दी केली. तर काही ठिकाणी संविधान के सन्मान में आम जनता मैदान में अशा घोषणा देत संविधान बचाव रॅली काढण्यात आल्या.