मनोज गवई
तालुका प्रतिनिधी, चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे :भारतीय जनता पार्टी (ग्रामीण ) अनिल बोंडे यांच्यावर 25 /11/2023 रोजी तिवसा येथे शंकरपटात दगडफेक केली .एका लोकप्रिय लोकप्रतिनिधीचा अशाप्रकारे अवमान करणे ही बाब योग्य नाही यासाठी भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्यांनी ह्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करून दगडफेक करणाऱ्या दोषी व्यक्तींवर कठोर कार्यवाही करून आरोपिंना अटक करन्यात यावी या करिता भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी चांदुर रेल्वे पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांना निवेदन दिले. निवेदन देताना भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष बबनराव गावंडे,शहर अध्यक्ष बंडू भुते,भाजपा युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष किरण शिवनकर, पप्पू उर्फ निलेश भालेराव,प्रविण्य देशमुख आणि रोशन खेरडे आणि अनेक कार्यकर्ते उपास्थित होते.


