पांडुरंग नरवाडे
तालुका प्रतिनिधी सेनगाव
स्वतंत्र भारत पार्टीची हिंगोली येथे जिल्हा बैठक झाली. या बैठकीत स्व.भा.पा.चे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट व.महिला प्रदेशाध्यक्ष सीमा नरोडे यांनी जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती केली. स्वतंत्र भारत पक्षाच्या अध्यक्ष मंडळाचा महाराष्ट्र दौरा सुरू असून दिनांक 27 /11/2023 रोजी हिंगोली जिल्ह्याची बैठक.हळद मार्केट,कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथे घेण्यात आली. या बैठकीत जिल्ह्यातील प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त, वीज प्रश्न व कर्जमुक्ती या विषयांवर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. देशात असलेले सर्व प्रस्थापित पक्ष दिशाहीन झाले आहेत. भ्रष्टाचारातून पैसा व पैशातून सत्ता या दृष्टचक्रात सर्व अडकले आहेत. जनता त्रस्त आहे. स्वतंत्र भारत पार्टी हा देशाला योग्य दिशेने घेऊन जाणारा पर्याय आहे. बेरोजगारी, महागाई, गुन्हेगारी सारख्या समस्या सोडवून. कायद्याचे राज्य स्थापन करण्याचा व तरुणांना रोजगार देऊन महागाई नियंत्रित करण्याची क्षमता. स्व.भा.पा.च्या जाहीर नाम्यात आहे.असे अनिल घनवट यांनी सांगितले. महिलांनी फुकटचे धान्य व साड्यांना भुलून शोषण करणाऱ्या पक्षांना निवडून देऊ नये.असे मत महिला आघाडी प्रदेशाअध्यक्षा सीमा नरोडे यांनी व्यक्त केले.ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.उत्तमराव वाबळे यांची स्वतंत्र भारत पक्षाच्या जिल्हा अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. या बैठकीसाठी शेतकरी संघटनेच्या माजी महिला आघाडी अध्यक्षा अंजलीताई पातूर्कर, जिल्हा अध्यक्ष देवीप्रसाद ढोबळे, डॉ.पातुरकर, खांडबाराव पोले, युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष राजू कुटे, मराठवाडा प्रमुख युवा आघाडी प्रल्हाद राखोंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
दिनांक – 27/11/2023