अलिम शाह
तालुका प्रतिनिधी मोताळा
बुलढाणा येथील अजिंठा शासकीय विश्रामगृह येथे मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट,मार्टि कृति समिती महाराष्ट्रच्या बुलढाणा जिल्हा बैठक पार पाडली,येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात मार्टिची स्थापन करणे बाबत शासनाची लक्षवेधी करणे करिता येणाऱ्या एक तारखेला जिल्हाधिकारी कार्यलय बुलढाणा समोर एक दिवसीय लक्षवेधी धरणे अल्पसंख्याक समाजाच्या वतीने करण्यात यावे,जेणे करून शासन ज्याप्रमाणे सारथी बार्टी महाज्योति अमृत या स्वायत्त संस्था विविध घटकांच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती सुविधा देत आहे,त्याच प्रमाणे अल्पसंख्याक साठी मार्टि नावाने स्वायत्त संस्था करून अल्पसंख्याक समाजाचा विकास करावा अशी मांगणी पूर्ण राज्यभरातून होत आहे,
सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने लोकशाही मार्गाने होत असलेल्या या धरणेमध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन समितीने केले आहे,यावेळी मोईन काजी,बिलाल डोंगरे,जाकीर कुरेशी,अँड वसीम कुरेशी,तारिक नदीम,सय्यद वसीम, आबिद कुरेशी, बबलू कुरेशी,सुफियान भाई,रफिक कुरेशी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती,