संतोष भरणे
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर- शेतकऱ्यांनी दुष्काळ सदृश्य परिस्थिती मध्ये आस्मानी व सुलतानी संकटांना तोंड देऊन पोटच्या पोराप्रमाणे संभाळ केलेल्या द्राक्ष बागा मागील दोन-तीन दिवसापासून ढगाळ वातावरणामुळे व अवकाळी पावसामुळे इंदापूर तालुक्यातील कळस,बोरी,या भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी.या ढगाळ वातावरणामुळे अधिकचे महागडे स्प्रे घेऊन आर्थिक संकटात सापडला आहे.या ढगाळ वातावरणामुळे छाटणी झालेल्या द्राक्ष बागा मध्ये डाऊनी मिलड्यु ,पावडरी मिलड्यु व फ्लॉवरिंग स्टेजमध्ये असलेल्या द्राक्ष बागा मध्ये गळ,कुजी चा प्रादुर्भाव होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादना मध्ये घट होत आहे.शेतकऱ्यांकडून फळबागा वाचवण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी घेऊन पिके वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत आहेत.शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसत आहे. त्याचबरोबर कांदा,गहू, ज्वारी,या पिकांवरती मररोग.तांबेरा,असे अनेक रोगांचा प्रादुर्भाव दिसत आहे. अगोदरच रासायनिक खतांच्या,कीटकनाशके,तणनाशके, यांचे वाढलेल्या भरमसाठ किमतींमुळे बळीराजा मेटाकुटीला आला आहे.शेतकऱ्याला आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.
चौकट-
यंदा पावसाळ्यात पाऊस पडला नाही एकीकडे दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यानं कर्ज काढून महागडी औषधे,खते,वापरून पिकावलेल्या शेतीचा अर्थातच शेतकऱ्याचा अवकाळी पावसाने बळी घेतलाय.कालची नाशिक निफाडला झालेली गारपीट आज इंदापूर तालुक्यातील कळस भागात झालेला अवकाळी पाऊस बदलते हवामान यामुळे द्राक्ष शेती धोक्यात आली.प्रत्येक वेळी अवकाळी झाली पंचनामे करा, तलाठी,ग्रामसेवक,कृषी अधिकारी यांच्या मागे फिरून पंचनामे करा फोटो काढा त्याला फोटोचे पैसे द्या.मात्र अनुदान मात्र मिळत नाही.गारपीट झाली,अवकाळी पाऊस झाला की नेते फक्त त्या भागाचा दौरा करतात फुकटचे सांत्वन करुन वेळ मारून नेतात मदत मिळत नाही अन् यांच्या येण्याने शेतकऱ्यांचं सुतक संपत नाही.त्यामुळे यांनी वेळ न घालविता तात्काळ शेतकऱ्याना मदत त्याच्या खात्यात जमा करावी.अन् ते नसेल जमत तर शेती पिकविण्यासाठी जो बोजा त्याने 7/12उताऱ्यावर केला आहे तो कोरा करावा तरच शेतकऱ्याचे गारपीट अन् अवकाळीचे सुतक संपेल.
(विजय गावडे-कळस)
द्राक्ष उत्पादक शेतकरी.


