मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड येथील होली फेथ प्रायमरी स्कूल येथे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमचे अध्यक्ष प्रा अस्वार मॅडम होत्या तर प्रमुख उपस्थिती म्हणून सोनोने मॅडम इंगळे मॅडम शेळके मॅडम अग्रवाल मॅडम कुऱ्हाडे मॅडम रेखाते मॅडम वानखडे मॅडम फोपसे मॅडम वायकर ताई ढेंगेकर ताई राजारामजी इंगळे उपस्थित होते. यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. प्रा. अस्वार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधाना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले . डॉ बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत भारतीय संविधान हे जगातील एक आदर्श संविधानआहे.संविधानामुळे देशातील नागरिकांना हक्क व कर्तव्य मिळालेली आहेत सर्वांनी संविधानातील मूल्याची जपवणूक करावी असे सांगितले.विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवून आदर्श नागरिक बनावे असेही ते म्हणाले सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक कुऱ्हाडे मॅडम व सूत्रसंचालन शेळके मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन करून प्रिया वालचाळे मॅडम यांनी केला .


