संतोष पोटपिल्लेवार
शहर प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी:- संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या १५३ व्या जयंती निमित्त घाटंजी येथे शिंपी समाजाच्या वतीने जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून घाटंजीतील पोलीस उपनिरीक्षक विलास सिडाम व पोलीस उपनिरीक्षक नागेश खाडे उपस्थित होते. तर कार्यक्रम अध्यक्षस्थानी केशवराव सिंगेवार प्रमुख पाहुणे विष्णुजी माकडवार,चंद्रशेखर नोमुलवार,अनंत नखाते,नामदेव गटलेवार, सौ. कविता कर्णेवार, राजु दिकुंडवार तथा घाटंजी शिंपी समाज अध्यक्ष सचिन कर्णेवार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात संत शिरोमणी नामदेव महाराज चौक घाटी येथिल फलकाचे पुजन कवडूजी पोटपिल्लेवार,संजय दिकुंडवार यांचे हस्ते करुन वारकरी फुसे काका यांना शाल श्रीफळ देउन करण्यात आले.शिंपी समाज भवन घाटी येथिल नियोजीत स्थळी रांगोळी,व संगीतमय भजन पूजनाने व लहान मुलांच्या विविध संत वेशभुषातील पेहराव आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व्दिप प्रज्वलन व संत नामदेव महाराज प्रतिमा पुजन करुन कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. मान्यवरांचे शाल श्रीफळ व संत नामदेव महाराज प्रतिमा,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमाला प्रास्ताविकातून शिंपी समाज अध्यक्ष यांनी संत नामदेव महाराज चरित्र व जयंती सोबतच घाटंजीत सूरु असलेल्या अविरत समाज संघटन व शिंपी समाज संस्था कार्यकारिणी करत असलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. उपस्थित मान्यवरांनी ही आपली मते व्यग्त करत संत साहित्य,जयंती उत्सव निमित्ताने प्रत्येकाने एकसंघ होउन गुण्या गोविंद्याने संत परंपरा जपत समाजहित साधावे हे विचार व्यक्त केले.कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यामधे, वैष्णवी कर्णेवार संगीत क्षेत्रात ,विपुल पोटपिल्लेवार (आर्मी सेवा) देत असल्या बदल,आरव कर्णेवार, यश पोटपेल्लीवार एल.एल.बी झाल्याबद्दल, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देऊन मान्यवर हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे मध्यंतरी मान्यवर यांच्या मनोगतात अनंत नखाते यांनी समाज संघटन ही काळाची गरज असून शिंपी समाजाची धूरा ही युवा नेतृत्वाच्या हाती देत ज्येष्ठांनी जे पाऊल उचलले त्यामुळे युवकांना मार्गदर्शन सोबत मनोधैर्य वाढविणारे असून त्याबद संघटना अबाधित ठेवण्यासाठी चाललेल्या कार्याचे कौतूक केले.कार्यक्रमाचे सुत्र संचालन अमोल कर्णेवार व प्रविण कर्णेवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजय दिकुंडवार, शंकर पोटपील्लेवार,बंडूजी बुर्रेवार,काशिनाथ नोमुलवार, संतोष पोटपिल्लेवार उमेश अक्केवार,आशिष कर्णेवार, प्रिती नोमुलवार, प्रशांत राजुलवार, संजय दिकुंडवार, संदीप पोटपिल्लेवार,बाबु पोटपेल्लीवार, शाम गटलेवार, विठ्ठल सिंगेवार तथा इतरही शिंपी समाज संघटना पदाधिकारी यांनी मेहनत घेतली मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार संजय दिकुंडवार यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता महाआरती व भोजन करुन करण्यात आली.









