संदीप टूले
तालुका प्रतिनिधी दौंड
दि.२६ नोव्हेंबर हा दिवस सर्वत्र संविधान दिन म्हणून साजरा केला जात असून याच पार्श्वभूमीवर एक हात मदतीचा फाउंडेशन यांच्यावतीने केडगाव परिसरातील चौफुला येथे विटभट्टीवर असलेल्या लहान मुलांबरोबर अनोख्या पद्धतीने
आगळावेगळा संविधान दिन साजरा करण्यात आला.आपल्याला एकता, एकात्मता, समता आणि बंधुता यांची मुल्ये स्विकारण्यास व अंगिकारण्यास महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ‘संविधान दिनाचे औचित्य साधून केडगाव येथील एक हात मदतीचा फाउंडेशन गृपच्या माध्यमातून विविध कार्यक्रम दरवर्षी राबवले जातात
हाक तुमची साथ आमची ह्या ब्रिद वाक्यास साजेसे असे आपल्या एक हात मदतीचा शैक्षणिक अभियानात सहभागी होऊन विटभट्टीवरील नव्याने जिल्हा परिषद शाळेत प्रवेशित २५ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून ख-या अर्थाने संविधान दिनाचे दर्शन आचरणातून दाखवून दिले. एक हात मदतीचा फाउंडेशनच्या माध्यमातून विटभट्टीवरील अनेक मुलांना नवीन कपडे, स्कूल बॅग यांचे वाटप करण्यात आले असून
अजूनही मुलांना स्वेटर, बुट, चप्पल, पाणी बॉटल यांची आवश्यकता असून समाजाच्या
प्रतिसादाच्या प्रतिक्षेत आहेत
आपली फुल न फुलाची पाकळी म्हणून मदत करण्यासाठी एक हात मदतीचा फाउंडेशनला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले
यावेळी धनराज मासाळ,शबनम डफेदार,गोरख मांडगे, शिक्षक यशवंत भारती यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते









