अमोल सावंत
तालुका प्रतिनीधी केज
केज : तालुक्यातील टाकळी फाट्याजवळ असलेल्या श्रीकृष्ण मठया ठिकाणी ह.भ.प.केशव महाराज शास्ञी व भक्तमंडळी यांच्या मार्गदर्शनाखाली आतिशय उल्हासात कार्यक्रम पार पडला .या कार्यक्रमाची सुरुवात ह.भ.प. किर्तन केसरी ,सरस्वती भुषण श्री.चंद्रकांत महाराज वांजळे,पुणे यांचं सुश्राव्य किर्तन झाले .नंतर सर्वांसाठी जेवण व्यवस्था केली .ज्या कार्यक्रमाची उत्सुकतेने सर्व दिव्यांग बंधु आणि भगिनी वाट पहात होते त्या कार्यक्रमाची रुपरेषा आलाऊंसीग करुन सांगण्यात आली सर्व दिव्यांग बाधवांना एका रांगेत बसवुन ज्यांनी नांव नोंदणी केली आहे आशांना जीवनावश्यक उपयोगी वस्तु भेट देण्यात आल्या .त्यामध्ये चटई ,बेडशीट, ब्लॕकेट ,फराळा चं साहीत्य आशा मानवाच्या तीन तीन मुलभुत गरजापैंकी दोन गरजा ची पुर्तता केली . अन्न अणि वस्ञ दान करण्यात आले .या कार्यक्रमा साठी सर्व भक्त मंडळी यांनी अथांग श्रम घेतले.बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले या न्यायाने दरवर्षी हा कार्यक्रम उत्साहात पार पडतो.खरोखर जो समाजामध्ये कमी लेखला जाणारा त्यांचा सन्मान व्हावा त्यांच्यातला ईश्वर समाधानी दिसावा ही भावना केशव महाराजांच्या मनात परमेश्वरांने निर्माण केला अणि भक्तीरसात न्हाउन निघाला. राष्ट्रीय अपंग विकास महासंघ राज्यसंचालक श्री. विनायकराजी लोंढे यांनी सर्व दिव्यांग बांधवाच्या वतीने केशव महाराज शास्ञी यांच स्वागत करुन आभार व्यक्त केले .सुत्र संचालन ह.भ.प.केशव महाज घुले ,टाकळीकर यांनी केले कार्यक्रम संपला असे जाहीर केले.