संतोष पोटपिल्लेवार
शहर प्रतिनिधी घाटंजी..
घाटंजी:-तालुक्यातील सायतखर्डां येथील ६५ वर्षीय शेतकऱ्यानं कर्ज बाजारीपणाला कंटाळुन विष प्राषण करून आत्महत्या केली. ही घटना गुरुवार दि.१६ नोव्हेंबर २०२३ रोजी घडली. या प्रकरणी यवतमाळ येथे पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. ज्ञानेश्वर महादेव अग्रवाल वय (६५) आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.सूत्रानुसार, अग्रवाल यांनी आपल्या राहत्या घरीच बिष प्राशन केले त्यांना सात एक्कर शेती असून ज्ञानेश्वर अग्रवाल यांना एक अपत्य आहेत.त्यांनी शेतातील नापिकी, अल्प उत्पन्न, शेतातील पिकांची दयनीय अवस्था व वाढलेल्या कर्जाच्या बोजाला कंटाळुन गुरुवार दि.१६ नोव्हेंबर रोजी आपल्या घरीच विष प्राषण केले. त्यानंतर उपचारासाठी घाटंजी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना यवतमाळ रेफर केले मात्र, यवतमाळ येथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली.