मनोज गवई
तालुका प्रतिनिधी चांदुर रेल्वे
चांदुर रेल्वे :-महाराष्ट्र शासनाने सन २०१७ पर्यंत कुष्ठरोगाची संसर्गिक साखळी खंडित करण्याचे उद्देशाने दिनांक २० नोव्हेंबर 2023 ते 6 डिसेंबर 2023 दरम्यान चांदुर रेल्वे शहरांमध्ये सक्रिय कुष्ठरुग्ण व क्षय रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे या मोहिमेमध्ये अति जोखीम असलेल्या भागांमध्ये घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणा दरम्यान सर्व पुरुष, स्त्री व लहान बालके यांची संपूर्ण तपासणी करण्यात येणार आहे. आपल्या शरीरावरील लालसर फिक्कट बधीर चट्टा, कानाच्या पाळ्या जाड होणे, हातापायांमध्ये सतत मुंग्या येणे व बधिर वाटणे, चेहरा तेलकट व चकाकणारा गुळगुळीत होणे ही लक्षणे कुष्ठरोगाची असू शकते तसेच पंधरा दिवस सतत खोकला, रात्री बारीक ताप, वजनात हळूहळू घट होणे ही लक्षणे क्षय रोगाची असू शकते तेव्हा आपल्याघरीसर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचारी किंवा स्वयंसेवक यांना सहकार्य करावे आणि त्यांचेमार्फत आपली तपासणी करून घ्यावी दिलेल्या पैकी कोणतेही लक्षणे आढळल्यास सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत तपासणी करून औषधोपचार सुरू करण्यात येईल व आपण या आजारातून संपूर्णपणे मुक्त व्हाल असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय चांदुर रेल्वे मार्फत करण्यात येत आहे.