मोहन चव्हाण
तालुका प्रतिनिधी परळी वैजनाथ
परळी दि:१८ नोव्हेंबर २०२३ परळी वैजनाथ येथील मिलिंद विद्यालयातील वर्गमित्रांचे स्नेहसंमेलन मिलिंद विद्यालच्या प्रांगणात पार पडले. विद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर वर्गमित्रांनी एकमेकांचा शोध घेवून तब्बल २३ वर्षांनंतर मिलिंद विद्यालय येथे माजी विध्यार्थी स्नेहमिलन सोहळा गुरुवार दि.१६ नोव्हेंबर २०२३ रोजी सोहळा आनंदात संपन्न झाला.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आघाव सर यांनी केले तर हे कार्यक्रम यश्वस्वी होण्यासाठी अशोक बुक्तर,शेख कलाम,रवि गित्ते,कुणाल गोदाम, अतिश अदोडे,बामाजी फड,अविनाश रोडे,गुणाजी कुंभार यांनी केले.
कौटुंबिक परिचय झाल्यानंतर जुने वर्गमित्र विरुद्ध अंताक्षरी सामना अत्यंत रंगतदार झाला.यावेळी विविध विनोद,उखाणे,गाणी व नृत्य सादर करून सर्वच वर्गमित्र जल्लोष स्नेहमिलन सोहळ्याचे लक्षवेधी आकर्षण ठरले.शाळेतील वर्गशिक्षकांनी सपत्नीक उपस्थिती देऊन वर्गमित्राचा उत्साह वाढविला. एकमेकांची थट्टा मस्करी करत मार्मिक चिमटे काढत यांनी केलेले सूत्रसंचालन वैशिष्ट्यपूर्ण झाले. सकाळी नाष्टा, दुपारी विविध पक्वानांवर ताव मारून पुन्हा भेटण्याचे अभिवचन देऊन वर्ग मित्रांनी जड अंतकरणाने एकमेकांचा निरोप घेतला.आनंद सोहळ्यात सर्व माजी विध्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते..
कौटुंबिक परिचय झाल्यानंतर मनोरंजक खेळ लिंबू चमचा खेळ , अंताक्षरी सामना अत्यंत रंगतदार झाला. व नंतर पाणीपुरीच्या आस्वाद घेतला सर्वच वर्गमित्र स्नेहमिलन सोहळ्याचे लक्षवेधी आकर्षण ठरले. विविध स्पर्धेत सहभागी होऊन धमाल दंगामस्ती करून पारिवारिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे केले.