अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 30 ऑक्टोंबर – सोमवारी कुर्ली केंद्रातील शिक्षण परिषद चिखलवर्धा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक उर्दू शाळेत पंचायत समिती घाटंजी द्वारे आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष जलालुद्दीन अयनुद्दीन सोलंकी हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामपंचायत चिखलवर्धा येथील प्रभारी सरपंच आकाश भगवान नडपेलवार, चिखलवर्धा येथील तंटामुक्त गांव समितीचे अध्यक्ष शेख अबरार हे होते. मार्गदर्शक म्हणून केंद्र प्रमुख विशाल साबापुरे हे होते. सुरुवातीला आलेल्या मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. तदनंतर शाळेतील वर्ग तिसरा आणि चौथीतील विद्यार्थ्यांनी सुंदर असा परिपाठ सादर केला. त्यानंतर कुर्ली येथील केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक विलास किरणापूरे व नवीन रुजू झालेल्या शिक्षकांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कुर्ली केंद्राचे केंद्र प्रमुख विशाल साबापुरे यांनी विविध शालेय उपक्रम विषयी मार्गदर्शन केले व इतर माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन फरोग अहेमद खान यांनी केले. तर आभार मोहसीन चव्हाण यांनी मानले. शिक्षण परिषदे मध्ये आलेल्या सर्व शिक्षकांनी या वेळी जेवणाचा आस्वाद घेतला, अशा प्रमाणे शिक्षण परिषद पार पडली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील मुख्याध्यापिका शमीम बानो शफी खान, मोहसीन चव्हाण, फरोग अहेमद खान आदींनी अथक परिश्रम घेतले.