अशोक कराड
ग्रामीण प्रतिनिधी करंजी
आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाकाडे वस्ती येथे शाळेतील शिक्षक
श्री. भुक्कन सर यांचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थी ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी ढोरजळगावने गावचे सरपंच श्री. गणेश कराड त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री तुषार कराड, भाऊसाहेब दादा कराड ,प्रकाश नाकाडे ,सुरेश कराड प्रकाश कराड ,संदीप नाकाडे मनोज कराड आदी पालक उपस्थित होते.त्यावेळी भुक्कन सर यांनी शाळेला कॅरम बोर्ड , चेस बोर्ड, बॅडमिंटन सेट ,हॉलीबॉल फूटबॉल ,उड्या मारण्यासाठी च्या दोऱ्या अशा प्रकारचं शालोपयोगी साहित्य भेट दिले . विद्यार्थ्यांनी अतिशय आकर्षक भेटकार्ड सरांसाठी तयार केले होते. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)