दिपक गोसावी
तालुका प्रतिनिधी तळोदा.
तळोदा:- सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२३ मधील जिल्हास्तरीय समिती व राज्यस्तरीय समितीने विहित केलेल्या निकषांच्या आधारे शिफारस केलेल्या राज्यस्तरावरील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नावे व जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे अन्य ४२ विजेत्यांचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नावे या आधीच शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली होती. त्यानिमित्ताने प्रकल्प संचालक पु. ल. देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी प्रभादेवी मुंबई यांनी सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२३ मधील विजेता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार वितरण करण्यासाठी समारंभाचे आयोजन केले होते. त्यामध्ये नंदुरबार जिल्हास्तरावर तळोदा येथील माळी नवयुवक गणेशोत्सव मंडळ तळोदा या मंडळाला महाराष्ट्र राज्य शासन व पु ल देशपांडे कला अकादमी मंडळ मुंबई मार्फत घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत श्री क्षत्रिय माळी नवयुग गणेश मंडळास सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र राज्यातून उत्तेजनार्थ व नंदुरबार जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक यापूर्वी जाहीर झाले होते. त्या पारितोषिकाचा वितरण समारंभ गुरुवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२३ रोजी दुपारी ०४.०० वाजता रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. या पारितोषिकाचे वितरण महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि वने मंत्री,सुधीर मुंडगट्टीवार यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर,त्याचबरोबर खा.राहुल शेवाळे,आ. सदा सर्वणकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी गणराज रंगी नाचतो हा सांस्कृतिक कार्यक्रम देखील सादर करण्यात आला.तसेच महाराष्ट्र शासनाच्या वतीने मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा प्रधान सचिव सांस्कृतिक कार्य विभाग विकास खारगे त्याचबरोबर प्रकल्प संचालक पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मुंबई येथील मीनल जोगळेकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन केलं.या कार्यक्रमाला पारितोषिकासाठी घोषित झालेले सर्व मंडळाचे अध्यक्ष यांच्यासह कार्यकारी मंडळातील सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.