दिपक गोसावी
तालुका प्रतिनिधी तळोदा.
तळोदा: केंद्र शासनाने एप्रिल २०२२ते मार्च २०२७ या कालावधीसाठी नवभारत साक्षरता कार्यक्रम सुरू केला आहे. सदर कार्यक्रमाच्या रोडमॅप नुसार राज्य साक्षरता मिशन प्राधिकरण स्थापन करणे बाबत नुकताच शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार मंत्रिमंडळाने दिलेल्या मंजुरीच्या अनुषंगाने केंद्र सरकार पुरस्कृत नवभारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. नवभारत साक्षरता अभियाना अंतर्गत १५ ते ३५ वयोगटातील निरक्षरांना साक्षर करण्यासाठी, सर्वांसाठी शिक्षण या संकल्पनेनुसार साक्षरता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यात महिला मंडळ, बचत गट, कलापथक, लोककला, लोककथा कलावंत, लोकशाहीर, लेखक, साहित्यिक, क्रीडा मंडळ तसेच डिजिटल पद्धतीने जसे की टीव्ही, रेडिओ, मोबाईल इत्यादींच्या माध्यमातून अशा लोकांना शिक्षण दिले जात आहे.त्याचप्रमाणे स्थानिक रोजगार पुनर कुशलता आणि उच्च कौशल्य प्राप्त करणाऱ्या दृष्टिकोनातून प्रौढ नव साक्षरतेसाठी निरंतर शिक्षणाच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून देशातील पंधरा वर्षे आणि त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्य विकसित करणे., स्थळ, स्वयंसेवक व शाळांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.देशातील पंधरा वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील विद्यार्थ्यांना निरंतर शिक्षण देणे यामध्ये कला, विज्ञान, तंत्रज्ञान, संस्कृती, क्रीडा,मनोरंजन तसेच स्थानिकांना स्वाराश्य असलेले विषय यांचा समावेश असल्याने या विषयाबाबत निरीक्षणांमध्ये जागृती घडून आणण्यासाठी स्वयंसेवक व शाळांच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.याचाच एक भाग म्हणजे नवभारत साक्षरता अभियान प्रशिक्षण हे होय.या प्रशिक्षणाचे आयोजन नुकतेच बोरद येथील शाळा क्रमांक दोन येथे दिनांक ११ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत करण्यात आले.या प्रशिक्षनाचे उद्घाटक व अध्यक्ष म्हणून केंद्रप्रमुख डी.जी.वायकर हे होते. तर या प्रशिक्षणाला केंद्रमुख्याध्यापक रउफ शहा , पदोन्नती मुख्याध्यापक यशवंत मोठे,भरत वळवी यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती . या प्रशिक्षणाचे प्रास्ताविक लोटन वाल्हे यांनी केले.तर केंद्रप्रमुख तथा अध्यक्ष यांनी प्रशिक्षणार्थी यांना मार्गदर्शन केले.यावेळी तज्ञ मार्गदर्शक म्हणून संदीप घुगे व
उंबरसिंग वसावे हे होते. यांनी प्रशिक्षणार्थींना अनेक मुद्द्यावर आधारित प्रशिक्षण दिले.
या प्रशिक्षणाला
बोरद केंद्रातील १३ जि.प.शाळांचे मुख्याध्यापक, आश्रम शाळांचे व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व बहुशिक्षकी शाळेतील १ उपशिक्षक हे हजर होते. या सर्वांनी प्रशिक्षणामध्ये सहभाग नोंदवत प्रशिक्षणाचा लाभ घेतला.
प्रशिक्षणात पहिल्या दिवशी उपस्थितांची नोंदणी करण्यात आली. त्यांनतर पूर्व चाचणी घेण्यात आली .तसेच उल्हास व्हिडिओ दाखविण्यात आला . नवभारत साक्षरता कार्यक्रम योजनेचा परिचय करून देण्यात आला. हा कार्यक्रम २०२२ ते २०२७ पर्यंत चालणारा कार्यक्रम आहे.या संदर्भात निघालेल्या दोन्ही शासन निर्णयाचे वाचन करून दाखवण्यात आले. नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निर्मिती साहित्याचा परिचय करून देण्यात आला. तसेच स्वयंसेवक मार्गदर्शिका, स्वयंसेवक हितगुज याविषयी माहिती देण्यात आली.स्वयंसेवकाची भूमिका ,स्वयंसेवक मार्गदर्शिका पुस्तिका ओळख याची माहिती देण्यात आली.यावेळी प्रवेशिका भाग एक याची माहिती देण्यात आली.या प्रशिक्षणासाठी बोरद नंबर एक व बोरद नंबर दोन शाळेतील शिक्षकांनी परिश्रम घेतले व प्रशिक्षणाची व्यवस्था केली केली.त्याचबरोबर दोन दिवसीय
प्रशिक्षणाचा समारोप करण्यात आला.