मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) अध्यक्षपदावर किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची सेवानिवृतती झाल्यानंतर हे पद गेल्या काही महिन्यांपासून रिकामेच होते. राज्य सरकारने MPSC च्या अध्यक्षपदी नवीन नियुक्ती केली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांची राज्याचे पोलीस महासंचालपदी नियुक्ती करण्यात आली होती. भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या ‘X’ खात्यावर पोस्ट करत राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.