भगवान कांबळे
तालुका प्रतिनिधी माहुर
माहुर -श्रीश्रेत्र माहुर येथील बळीराम पाटील माडंवी संचलित श्री रेणुकादेवी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथालय तथा ज्ञानस्त्रोत केंद्राच्या वतीने ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ एस आर रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त १२ऑगस्ट रोजी विनम्र अभिवादन करुन ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड यांच्या संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयातील मराठी, हिंदी, व इंग्रजी भाषेतील साहित्य अनुवादित ग्रंथ स्पर्धा परीक्षेशी संबंधित पुस्तकांची ग्रंथप्रदर्शनी भरविण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्ञानस्त्रोत केंद्राचे प्रमुख डॉ काशिनाथ राठोड यांनी केले तर उपस्थिततांचे आभार ज्ञानस्त्रोत केंद्राचे साहाय्यक शेख खलील यांनी व्यक्त केले या प्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ तुळशीदास गुरनुले यांच्या सह प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.