कैलास श्रावणे
तालुका प्रतिनिधी पुसद
पुसद तालुक्यातील आसोली गावातील सामाजिक व राजकीय छंद असलेले व्यक्तिमत्व यशवंत कोल्हे तालुकाध्यक्ष सरपंच संघटना पुसद .सरपंच सेवा महासंघ .यांना नवी दिल्ली महाराष्ट्र सदन येथे बहुजन ग्रामविकास सेवा महाराष्ट्र राज्य आयोजित राष्ट्रीय समाजभूषण २०२३पुरस्काराने गौरविण्यात आले. त्या बद्दल त्यांचे आसोली गावासह तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. त्यानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुसद येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये यशवंत कोल्हे यांना शाल , पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. व पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी तालुकाध्यक्ष बुद्धरत्न भालेराव, शहराध्यक्ष जयानंद उबाळे, कृष्णा दोडके, डॉक्टर अरुण राऊत,मधुकर सोनवणे, राजरत्न लोखंडे, कैलास धबाले, उत्तम धबाले, भास्कर बनसोडे, संजय धुळे सरपंच आनंद, शालिपुत्र ढोले, सिद्धार्थ सरकाटे, विनोद कांबळे, राजकुमार बोखारे दिलीप ताळीकोटे, रमेश धुळे ,सीमा धुळे, श्रद्धा कोल्हे नागेश गायकवाड, सोहेल खान , विनोद कांबळे तसेच बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.