फैय्याज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर
ओतूर :- बेल्हे (ता.जुन्नर) चे आजी- माजी आमदार व कार्यकर्ते एकमेकांना भिडले असून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले.या निमित्ताने आजी माजी आमदारांचा वाद पुन्हा एकदा समोर आला. बेल्हे गावातील रस्त्याच्या भूमिपूजना निमित्त माजी आमदार शरद सोनवणे व आजी आमदार अतुल बेनके एकमेकांना भिडले. दोन्ही आमदार समर्थकांनीही कार्यक्रमस्थळी जोरदार घोषणाबाजी केली. हा प्रकार गावात शनिवार सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला.
शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शरद सोनवणे विरुद्ध राष्ट्रवादीचे आमदार अतुल बेनकें यांच्यामधील टोकाचा राजकीय वाद या निमित्ताने पुन्हा एकदा समोर आला. यावेळी ‘चर्चा करायची नसेल तर मला गरज नसल्याचे शरद सोनवनेंनी बेनकेंना फटाकारले, तर रस्ता करत असताना अडचणीवर मात करुन पुढे जात असताना कुणाच्या राजकारणाची गरज नसल्याचे बेनकेंनी सुनावले. यावरुन दोन्ही आमदारांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली. आळेफाटा पोलीसांची मात्र चांगलीच दमछाक झाली. बराच फौजफाटा तैनात करण्यात आला होता.जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. दोन आमदारांच्या वादात आमचा काय दोष? गावची अब्रू वेशीवर टांगली,तालुक्यातील लोक येऊन आमच्या गावात राजकारण करतात, आमचा रस्ता करून द्या असे म्हणत ग्रामस्थांनी संतप्त सवाल उपस्थित केला आहे.