रितेश टीलावत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा : स्थानिक सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका कु. छाया गिरी ह्या नियत वयोमाना नुसार सेवानिवृत्त झाल्या निमित्त विद्यालयात सेवा पूर्ती व सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, प्रमुख उपस्थितीत संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे, ज्येष्ठ संचालक प्रकाशखोब्रागडे, संचालिका सौ. साधना भोपळे,माजी प्राचार्य प्रमोद जानोतकर,भोपळे विद्यालया च्या मुख्या ध्यापिका रजनी वालोकार, श्रीमती रतनबाई ताराचंद जी कानुंगा शाळेचे मुख्याध्यापक जगत व्यवहारे, चंद्रकांत गोसावी, प्रा.संतोषकुमार राऊत हे होते. याप्रसंगी शिक्षक, विद्यार्थी व
विद्यार्थिनी यांनी आपल्या मनोगतातून कु.छाया गिरी यांच्या ३६ वर्षाच्या सेवेतील आठवणींना उजाळा दिला. अध्यक्षीय भाषणात संस्थाध्यक्ष अनिलकुमार भोपळे यांनी निष्ठेने कर्तव्य पूर्ण केल्यास आनंद प्राप्त होतो तोच आनंद याप्रसंगी होत आहे असे मत प्रतिपादन करून त्यांना भावी वाटचाली साठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्या वालोकार यांनी विद्यार्थ्यां च्या आग्रहास्तव सेवा निवृत्तीनंतर एक वर्ष कु. गिरी यांनी मानसेवी तत्वावर शैक्षणिक सेवा देत शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले हाच त्यांच्या कार्याचा गुणगौरव असल्याचे सांगितले. या कार्याचा गौरव म्हणून महात्मा फुले शिक्षण संस्था, सहदेवराव भोपळे विद्यालय व श्रीमती रतनबाई ताराचंदजी कानुंगा शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रंजित राठोड, अभिजित भोपळे, स्वप्नील गिऱ्हे, प्रशांत भोपळे, डॉ.मयुर लहाने, निलेश गिऱ्हे, सुनील वाकोडे, निलेश कासोटे, पदमा टाले, दुर्गा बोपले, आरती इंगळे, रवींद्र सोळंके, अमोल येऊल, निखील भड, अमोल दामधर, प्रतिभा इंगळे, रामकृष्ण भड,अंबादास चाफे,गजानन पवार, निलेश दांडगे,सुनील धुरदेव आदी शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन गणेश खानझोडे तसेच आभारप्रदर्शन संस्थेचे सहकार्यवाह स्नेहल भोपळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सर्व शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी वृंद,विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी अथक परिश्रम घेतले.
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)
![](https://i0.wp.com/adhikarnama.in/wp-content/uploads/2021/07/41795f06-911f-4a48-906f-66953021f824.jpg?fit=1080%2C1080&ssl=1)