मारोती सुर्यवंशी
शहर प्रतिनिधी, नरसी
नरसी : शहर व परिसरात काल रात्री पासून झालेल्या संततधार पावसामुळे परीसरातील शेतीचे, तसेच पावसाचे पाणी नरसी शहरात घराघरांत, बाजार पेठेतील अनेक दुकानांमध्ये शिरून अतोनात नुकसान झाले आहे.त्याच बरोबर जनतेची अत्यंत हालहाल झाले आहेत.सर्वत्र जलमय परीस्थिती निर्माण झाली आहे. परीसरातील सर्व नद्या, नाले ,ओढे भरभरून वाहत आहेत . त्यामुळे सर्व त्र पूरजन्य परीस्थिती आहे.आसे असताना शहरातील पदाधिकारी सोडले तर बाकी शासनाच्या वतीने किंवा कोणत्याही निर्वाचित लोकप्रतिनिधींनी इकडे लक्ष दिले नाही.किंवा साधी विचारपूस करायला कोणी आलें नाहीं.याचा अर्थ काय? नरसी सर्कल परीसरातील विकासासाठी किंवा कोणत्याही प्रकारची कामे, नैसर्गिक आपत्तीत यातून सामान्य जनतेला दिलासा देण्यात सर्वच राजकीय नेत्यांची, लोकप्रतिनिधींमध्ये उदासिनता दिसून येते आहे आशा चर्चा जनतेतून होत आहेत. नरसी शहरातून जाणाऱा महामार्गावरील वाहतूक कोंडी झाली होती तेव्हा रामतीर्थ पो.स्टे.चे कर्तव्य दक्ष अधिकारी स.पो.नि.संकेत दिघे व पोलिस कर्मचारी, प्रशासन जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी तत्पर सेवेसाठी हजर राहून प्रयत्न करतात.सदरील शहराचा व परिसरात शासनाच्या वतीने त्वरीत पंचनामे करून संबंधित शेतकरी व सर्व बाधित झालेल्यांना शासकीय मदत मिळवून द्यावी अशी मागणी जनतेकडून होते आहे.