गणेश सवने
शहर प्रतिनिधी सेलू
सेलू :- दि 23 रविवार रोजी शहरातील मोंढा परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या जवळ महात्मा गांधी यांच्या अर्धा कृती पुतळ्यास काॅ .रामकृष्ण शेरे पाटील व दतुसिंह ठाकूर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अल्पक्लेश आंदोलनाची सुरूवात सकाळी 11 वाजता करण्यात आली. या आंदोलनाचे प्रास्ताविक शेख महेमुद यांनी मांडले ते प्रास्ताविकात म्हनाले की मतदार
एका पक्षास निवडून देत आहेत आणि निवडून आल्यानंतर आमदार दुसऱ्याच पक्षात प्रवेश करुन मतदारांचा विश्वासघात करत आहेत. हि बाब सरळ सरळ मतदारांची फसवणुक आहे.
जनता अनेक समस्यांना तोंड देत असून लोकप्रतिनिधी मात्र सत्ता उपभोगण्यात व्यस्त आहे.
देशात व राज्यात वाढती महागाई, भ्रष्टाचार, वाढती बेरोजगारी, मनीपुरच्या भगिनी वरील अत्याचार या साऱ्या बाबींवर रोष व्यक्त करण्यासाठी सेलू येथील जागरुक मतदार व नागरीकांतर्फे रविवार रोजी मोंढा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकाजवळ आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी शेख महेमुद, काॅ रामकृष्ण शेरे पाटिल,काॅ रामेश्वर पौळ, ॲड.विष्णु ढोले यांनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात रामेश्वर उघडे,शेख रहीम भाई , दत्तू सिंग ठाकूर, जाहेद घौरी,जकी सर, सुनिल गायकवाड, शेख साजीद, शेख अमजद बागवान, शेख नफीस, बापू धापसे, जावेद घौरी, राजीक कुरैशी, शेख इसाक, शेख हदि, शेख एजाज, शेख मुख्तार, सह नागरिकांची उपस्थिती होती.


