अजिंक्य मेडशीकर
तालुका प्रतिनिधी मालेगांव
मालेगाव :- शहारा मध्ये जागोजागी पाण्याचे डबके साचले असून याकडे नगरपंचायत चे दुर्लक्ष असल्याने डास क दुर्गंधी सगळीकडे पसरली आहे.
शहरातील प्रभाग क्र ०३ बोरगाव रोड लगज सोनू अहिर यांच्या घराजवळील असलेल्या नाल्या मध्ये गेल्या-कित्येक दिवसापासून पाणी एकाच जागी स्टॅन्ड झाला आहे, त्यामुळे तिथल्या व परिसरातल्या नागरिकाच्या आरोग्यस धोखा निर्मिण होऊ शकतो,न.प. यांनी या साडपाण्याची विल्हेवाट लावावी,व त्या ठिकाणी मुरूम टाकण्यात यावा.. तात्काळ न.प.यांनी मालेगाव शहरामध्ये डेंगूची फवारणी करण्यात यावी. याकरिता मुख्याधिकारी याना सुद्धा बोलणे झाले असून यावर मात्र काहीही कारवाई झालेली नाही.मालेगाव नगरपंचायत क्षेत्रातील अनेक भागात पावसाळ्यात पाणी साचते त्या ठिकाणी डास निर्मान होतात आणि दुर्गंधी सुटते शहरातल्या नाल्या सफाई सुद्धा वेळवर होत नाही. याकडे नगर पंचायत ने लक्ष देण्याची गरज आहे.
“शहरामधील सर्व असे नाले आहेत जे पावसाळ्यात शहरामध्ये मोठया प्रमाणात पाणी जमा होतो अशा ठिकाणी मुरूम टाकून ते नाल्या व खड्डे बुजविण्यात यावेत नाले सफाई नियमित करण्यात यावी.”
– सागर जगताप(सामाजिक कार्यकर्ते)