मुंबई : कोरोना रुग्णसंख्येच्या बाबतीत थोडीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या शुक्रवारच्या तुलनेत काहीशी कमी झाली आहे. राज्यात आज २७६० नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच २९३४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आज ५ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. राज्यात आतापर्यंत ७८,३४,७८५ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आता राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९२ टक्के इतकं आहे. मृत्यू दर १.८४ टक्के इतका आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,२३,४५,३२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,०१,४३३ (९.७२ टक्के) नमनु पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज सक्रिय रुग्णांची संख्या १८,६७२ आहे. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ६३७१ रुग्णसंख्या पुण्यातील आहे. त्यानंतर मुंबईतील रुग्णांची संख्या ४,११५ आहे. देशातील कोरोना आकडेवारीविषयी सांगायचं तर गेल्या २४ तासांत नवीन कोरोनाबाधितांसह कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात कोरोनाच्या १८ हजार ८४० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत ४३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.











