देसाईगंज येथे जुनी पेन्शन समन्वय समितीचा सभेचे आयोजन
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
गडचिरोली : जुनी पेन्शन संघर्ष समिती मार्फत महाराष्ट्राभर पेन्शन संघर्ष यात्रा सुरू आहे. ती पेन्शन संघर्ष यात्रा गडचिरोली जिल्ह्यात आल्यावर देसाईगंज तालुक्यासह जिल्ह्यातील शेकडो कर्मचारी सहभाग घेणार आहेत. त्यासाठी देसाईगंज येथे तालुका जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समितीची सहविचार सभा आयोजित करण्यात आली.महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेसोबत महाराष्ट्र राज्यातील 60 पेक्षा अधिक संघटना एकत्र येत पेन्शन संघर्ष यात्रा महाराष्ट्रभर फिरत आहे. हीच पेन्शन संघर्ष यात्रा आपल्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 6 डिसेंबर 2021 ला गडचिरोली या जिल्हा मुख्यालयाला येत आहे.त्या अनुषंगाने देसाईगंज तालुका जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती स्थापन करून पेन्शन यात्रेत सहभाग आणि नियोजन सभा पार पडली.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून धनपाल मिसार जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक समिती गडचिरोली हे होते.तर प्रमुख अतिथी जगदिश केळझरकर तालुका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद,गुरुदेव नवघडे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना,अतुल बुराडे तालुकाध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना,रामेश्वर गभणे सचिव उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष धनपाल मिसार यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कासाठी आता एकत्र येऊन लढा देण्याची नितांत गरज आहे.त्यासाठी पेन्शन संघर्ष यात्रा मध्ये जिल्ह्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. गुरुदेव नवघडे म्हणाले कि, 6 डिसेंबरला गडचिरोली येथे येणाऱ्या पेन्शन संघर्ष यात्रेत गडचिरोली जिल्ह्यातील सर्वच कर्मचाऱ्यांनी हजारोंच्या संख्येत उपस्थित राहून शासनाला आपली ताकद दाखवावी.प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था देसाईगंज येथील सभागृहात सभा घेण्यात आली.सभेत पेन्शन संघर्ष यात्रेत तालुक्यातील सर्वच कर्मचारी यावेत म्हणून केंद्र निहाय आणि तालुका मुख्यालय कार्यालय करिता संपर्क,प्रसार,प्रचार आणि लढा निधी उभारणी समिती स्थापन करण्यात आल्या.पेन्शन यात्रेत सहभाग याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले.या सभेला कार्याध्यक्ष जितेंद्र मेश्राम,उपाध्यक्ष प्रमोद मेश्राम,कोषाध्यक्ष मनोज ढोरे,वनविभागाचे सुरज ठाकूर,जिल्हा परिषदचे शिक्षक सहकोषाध्यक्ष राकेश मडावी,सुनील भरणे,मनीष होळी,जितेंद्र आत्राम,सुनील रेहपाडे,दीपक पेंदाम,अनिल राठोड,खाजगीचे शिक्षक रतन सलामे,सय्याजी कापगते,प्रमोद नन्नावरे,दीलीप शेंडे,विश्वास श्रीरामे,हरिदास पेंदाम उपस्थित होते.सभेचे आयोजन जुनी पेन्शन संघर्ष समन्वय समिती देसाईगंजकडून केले होते.प्रास्ताविक अतुल बुराडे तर संचालन आणि आभार रामेश्वर गभणे यांनी केले.