संजय शिंदे
जिल्हा प्रतिनिधी पुणे
इंदापूर तालुक्यातील अकोले येथील एक कुटुंबीय मौजे पिंपळे ता इंदापुर जि पुणे येथे असले पद्मावती मंदीर येथे देवीचे दर्शनासाठी आले होते. त्यावेळी सदर कुंटुंबियांचे २० तोळे सोन्याचे दागिने असलेली बंग त्यांचेकडुन नजरचुकीने पिंपळे रस्त्यावर पडली होती. कुटुंबीय घरी गेल्यावर त्यांचे लक्षात आले की, आपले सोन्याचे दागिने असलेली बॅग मिळुन येत नाही. त्यावेळी त्यांचे लक्षात आले की, पिंपळे येथे श्री पद्मावती देवीचे दर्शनासाठी गेल्यावरती सदर बॅग गहाळ झाली आहे. त्यावेळी सदर कुंटुबीय हे पुन्हा अकोले वरुन पिंपळे येथे दागिने शोधण्यासाठी गेले असता त्यांनी सदर घटनेबाबत मंदीर व परीसरात विचारपुस केली.त्यावेळी पिंपळे गावातील रहीवासी महिला नामे सौ. लता सुनिल वाबळे रा. पिंपळे पाटी, पिंपळे ता इंदापुर जि. पुणे यांना सदर बातमी समजताच त्यांनी पदमावती मंदीर येथे धाव घेतली. सदरवेळी त्यांनी उपस्थित जमलेले सर्व लोंकासमक्ष त्यांना पिंपळे गाव ते पिंपळे पाटी रस्त्यावर सकाळी ११.०० वाचे सुमारास एक बंग मिळाल्याचे सांगुन त्यात सोन्याचे मौल्यवान दागिने असल्याबाबत सांगितले. सौ लता सुनिल वाबळे यांनी सर्व उपस्थित लॉकासमक्ष त्यांना सापडलेले अंदाजे २० तोळे दागिने अकोले येथील मुळ कुटुंबीयांना परत केले आहे. सदर ठिकाणी सर्व उपस्थित लोकांनी त्यांचे आभार मानून त्यांचे प्रामाणिकपणाचे कौतुक केले. सदर महिलेच्या प्रामाणिकपणाचे इंदापुर तालुक्यात सध्या जोरदार चर्चा चालु आहे. सध्याच्या युगात २० तोळे सोन्याचे दागिने मुळ मालकाला परत करुन सौ लता सुनिल वाबळे यांनी प्रामाणिकपणाचे नवे उदाहरण सर्व जनतेसमोर ठेवले आहे.सौ. लता सुनिल वाबळे रा. पिंपळे ता इंदापुर जि पुणे यांनी अकोले येथील एका कुटुंबीयांचे २० तोळयांचे दागिने प्रामाणिकपणे परत केल्याने सौ. लता व त्याचे पती श्री सुनिल हरीबा वाबळे यांचे भिगवण पोलीस ठाणेचे प्रभारी आधिकारी श्री. विनोद महांगडे व पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी सदर महिलेचा सत्कार केला आहे. सदर सत्कार प्रसंगी भिगवण पोलीस ठाणेचे पोसई निश्चल शितोळे, विठ्ठल वारगड, व सर्व पोलीस स्टाफ उपस्थित होता. सौ लता सुनिल वाबळे रा. पिंपळे ता इंदापुर जि पुणे यांचे त्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक होत आहे.







