गणेश ताठे
तालुका प्रतिनिधी आकोट
अकोट:- स्थानिक श्री दुर्गा माता मंदिर संस्थान ट्रस्ट यांच्या वतीने माता मैदान येथे चैत्र नवरात्र महोत्सव आणि संस्थानचे अमृत महोत्सव निमित्त श्रीमद देवी भागवत कथा 30 मार्च रोजी सुरुवात झाली, सुरुवातीला घटस्थापना पार पडून दुपारी भजनी दिंडी सह श्रीमद देवी भागवत ग्रंथाचे स्वागत करून सुरुवातीला श्रीमद देवी भागवत आरतीने कथेची सुरुवात झाली. संपूर्ण सृष्टी ही भगवती देवीच्या शक्तीने निर्माण झालेली आहे असे प्रतिपादन भागवताचार्य गौरव व्यास महाराज यांनी केले. ही कथा 30 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान दररोज दुपारी 2 ते 6 वाजेपर्यंत होईल तसे दररोज 12 वाजता अन्नदान होणार आहे भाविकांनी या कथा प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री दुर्गा माता मंदिर संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व सदस्यांनी केले आहे.


