राहुल दुगावकर,
बिलोली तालुका प्रतिनिधी
बिलोली हे शहर तेलंगणा राज्याला लागून असून राज्य महामार्गावर हा तालुका असल्याने याला अधिक महत्त्व प्राप्त होते. तालुक्यात जवळपास अनेक गावांचा समावेश असून एखादी दुर्घटना घडल्यास रूग्णांना बिलोलीपासून दीड तासाच्या अंतरावर असलेल्या नांदेड येथे किंवा अर्धा ते एक तास अंतरावर असणाऱ्या तेलंगणा राज्यातील बोधन आणि निझामबाद येथे उपचारासाठी जावे लागते. नागरिकांना अनेक आरोग्य अडचणी येत असल्यामुळे बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रूग्णालयात रुपांतर झाले. परंतु आरोग्य क्षेत्रातील महत्वाची पदे रिक्तच असल्याचे बिलोली शहरातील माहिती अधिकार तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि सुप्रीम ह्यूमन राइट्स इंडिया चे राष्ट्रीय संघटक लक्ष्मीकांत कलमुर्गे यांनी म्हटले आहेत. त्यात परिसेविका, अधिपरिचारिका, सहाय्यक अधिसेविका, नेत्र चिकित्सा अधिकारी, प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी असे आरोग्य क्षेत्रात अत्यंत महत्वाचे पदे रिक्त असल्याचे धक्कादायक माहिती मिळाली असल्याचे कलमूर्गे यांनी म्हटले आहेत. अधिपरिचारिका म्हणजे माता आणि बाल आरोग्य सेवा देणारी परिचारिका. ती प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये काम करते. अधिपरिचारिकांची जबाबदार पद असून माता आणि बाल आरोग्य सेवा देणे, रूग्णांची लक्षणे ओळखणे, औषधोपचार करण्यासाठी उपाययोजना करणे, लक्षणे कमी करण्यासाठी इतर उपाय करणे, रूग्णांच्या आरामासाठी आणि कुटुंबांची समज आणि अनुकूलता अनुकूल करण्याची काम असते. परिसेविका म्हणजे रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवणारी आणि त्यांची काळजी घेणारी एक प्रशिक्षित महिला, जी ‘नर्स’ म्हणून ओळखली जाते. हे पद आरोग्य क्षेत्रात एक महत्त्वाचे पद आहे, जिथे सहायक अधिसेविका रुग्णांना योग्य सुविधा आणि सेवा पुरवतात. सहाय्यक अधिसेविका म्हणजे रुग्णालयात किंवा आरोग्य संस्थेत अधिसेविका यांना मदत करण्यासाठी काम करणारी व्यक्ती. त्या अधिसेविकांच्या देखरेखेखाली रुग्णांची काळजी घेतात आणि इतर कामांमध्ये मदत करतात. रुग्णालयात, सहायक अधिसेविका रुग्णांना औषधं देतात, त्यांची शारीरिक तपासणी करतात, त्यांना जेवण देतात आणि त्यांच्या गरजा पूर्ण करतात. प्रयोगशाळा वैद्यकीय अधिकारी म्हणजे वैद्यकीय प्रयोगशाळेत काम करणारा एक तज्ञ, जो विविध वैद्यकीय चाचण्या आणि प्रयोग करतो, ज्यामुळे रोगनिदान, उपचार आणि प्रतिबंधासाठी मदत होते. चाचण्या करण्याचे असते. वैद्यकीय प्रयोगशाळेत विविध चाचण्या (उदा. रक्त, मूत्र, पेशी) करणे आणि त्यांचे विश्लेषण करणे. निष्कर्ष काढणे असे काम असते. चाचण्यांच्या आधारे निष्कर्ष काढणे आणि डॉक्टरांना अहवाल देणे. गुणवत्ता नियंत्रण करण्याचे कार्य असलेले अत्यंत महत्वाचे पद प्रयोगशाळेतील साधनांची आणि प्रक्रियेची गुणवत्ता तपासणे आणि योग्य राखणे. संशोधनाचे काम असणाऱ्या नवीन वैद्यकीय चाचण्या आणि तंत्रज्ञानाचा शोध घेणे. नेत्र चिकित्सा अधिकारी म्हणजे डोळ्यांशी संबंधित आजार आणि समस्यांवर उपचार करण्यासाठी विशेष प्रशिक्षण घेतलेला डॉक्टर, ज्याला नेत्ररोग तज्ञ किंवा डोळा डॉक्टर देखील म्हणतात. असे महत्वाचे जबाबदार पदे लवकरात लवकर भरावे अशी मागणी कलमूर्गे यांनी केली आहेत.


