मारोती सुर्यवंशी
तालुका प्रतिनिधी नायगाव
मौजे नरसी येथील सेवा सहकारी सोसायटी ची निवडणूक नुकतीच 16 मार्च रोजी पार पडली. यात महाविकास आघाडी पुरस्कृत “गावकरी विकास पॅनल” विरुद्ध “आपलं पॅनल” भारतीय जनता पार्टी यांच्यात सरळ पण अटीतटीची लढत पहावयास मिळाली दोन्ही पॅनल तर्फे प्रत्येकी तेरा –तेरा उमेदवारांनी आपले नशीब आजमावले त्यात काट्याची लढत होऊन म.वि.आ.ने 07::06, अशी बाजी मारली . या निर्णयातील पांडुरंग बागडे विरुद्ध जनाजी खणपटे यांच्या एका जागेवरून भाजपचे नेते श्रावण भिलवंडे यांनी उप निबंधक कार्यालय नांदेड येथे बागडे च्या निवडीला आक्षेप घेत फेर मतमोजणी ची मागणी केली तेव्हा त्यांनी फेर मतमोजणी करण्यात यावे असे आदेश दिले त्यावरून सहाय्यक उपनिबंधक कार्यालय नायगाव येथील कार्यालयात राज्य राखीव पोलीस दलासह कडेकोट बंदोबस्तात इन कॅमेरा फेर मतमोजणी करण्यात आली त्यात अगोदर विजयी ठरलेले पांडुरंग बागडे यांचा दोन मतांनी पराभव होऊन पुर्वी पराभुत झालेले जनाजी खणपटे हे विजयी झाले त्यामुळे आता इकडचे 07 सदस्य तर तिकडचे 06 सदस्य असे समीकरण झाले आहे “हार कर जो जितता हैं उसे “बाजीगर” कहते हैं अशी स्थिती आपलं पॅनल बद्दल घडली. “त्यांबाबत माहिती अशी की हि निवडणूक म्हणजे येणाऱ्या काळात होणाऱ्या नरसी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची जणू रंगीत तालीम होती यासाठी येथील नेत्यांनी साम,दाम, दंड , भेद चा वापर करीत हि निवडणूक प्रतिष्ठेची केली होती प्रत्येक उमेदवाराने व पॅनल प्रमुखांनी आपला अनुभव पणाला लावला अनेक तर्कवितर्क ,हातखंडे, युक्त्या, वापरून ,आश्वासने देऊन मतदारास आपल्या बाजूने ओढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली….जणू शर्यतच लागली होती परंतु येथील हुशार मतदारांनी 16 मार्च रोजी म.वि. आघाडीला 07::06 सात :: सहा आसा कौल देऊन सेवा सहकारी सोसायटी नरसी ची सेवा करण्याची संधी दिली .या महाविकास आघाडीच्या विजयाचे शिल्पकार काँग्रेसचे संभाजी पा. भिलवंडे, राष्ट्रवादी चे जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर पा.भिलवंडे, नायगाव तालुका शिवसेना प्रमुख रवींद्र पा. भिलवंडे, मोहनराव पा. भिलवंडे, भा.ज.पा.चे जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे, राजेश पा.भिलवंडे व सरपंच गजानन शिवाजीराव भिलवंडे, भास्कर कोकणे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या अथक परिश्रमाने विजय मिळवला …. तो विजय म.वि.आ.साठी औटघटकेचा ठरलाय का? . कारण भारतीय जनता पक्षाचे माजी नांदेड जिल्हा सरचिटणीस श्रावण पा.भिलवंडे यांनी एकाकी झुंज देत आपल कौशल्य, राजनैतिक अनुभव पणाला लावून कडवी लढत दिली तरी सुद्धा त्यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले. पण हार न मानता श्रावण पा. भिलवंडे यांनी उप निबंधक कार्यालय नांदेड येथे धाव घेतफेर मतमोजणी ची मागणी केली व उपनिबंधक कार्यालय नांदेड यांच्या आदेशानुसार झालेल्या फेर मतमोजणीत आपलं पॅनल चे जनाजी खणपटे यांचा विजयश्री खेचून आणला. दरम्यान आ दोन वेळा फेर मतमोजणी कशी? केवळ 388 ते 400 अशी माफक मत असताना घोळ झाला की चूक … दोन — दोन वेळा मोजणी हे न समजणारे कोडं आहे “कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर” यामुळे नागरिकांमध्ये मतमोजणी करणार्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या बद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. स्पष्ट बहुमत कुणाला? श्रावण भिलवंडे यांच्या दिमतीला मा. सरपंच व्यंकट कोकणे, माजी सरपंच प्रतिनिधी गजानन पांडुरंग पा.भिलवंडे , गंगाधर वडगावे, यांनी भरपूर प्रमाणात प्रयत्न केले परंतु…. निकाला नंतर मतदार व गावकरी यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना आम्ही आमचं कर्तव्य पार पडल पण….. इथे तर एक मेकावर “कुरघोड्या” करण्यात धन्यता मानली जात आहे ज्यावेळी बहुमत कुणाला हे चित्र स्पष्ट होईल तेव्हा खरा सिकंदर आणि खरा बाजीगर कौन आहे हे लक्षात येईल.सध्यातरी खरं काय हे दोन्ही पॅनलच्या प्रमुखांनाच माहीत आपलं काय!अशी दबक्या आवाजात चर्चा ऐकायला मिळते आहे. एकंदरीत हि निवडणूक येणाऱ्या काळात होणाऱ्या नरसी ग्रामपंचायत,व जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक मतदारांना गृहित धरुन चालणार नाही हे लक्षात ठेवा असा संदेश देणारीच ठरली . 16 मार्चला विजयी सभा झाली ह्या निवडणूकीत विजयी झालेल्या उमेदवारांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या विजयी सभेला शिवसेनेचे रवींद्र भिलवंडे यांनी मार्गदर्शन केले होते व विजयी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आणि मतदारांचे आभार मानले.याप्रसंगी नायगावकर श्रीनिवास पाटील चव्हाण,जि.प.सदस्य माणिकराव लोहगावे, काँग्रेसचे संभाजी पा. भिलवंडे राष्ट्रवादी चे जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर भिलवंडे, शिवसेनेचे रवींद्र भिलवंडे, राजीव गंदिगुडे, मोहनराव पा.भिलवंडे ., सरपंच गजानन शिवाजीराव भिलवंडे, भास्कर कोकणे, बालाजी तुप्पेकर , शिवाजी कोकणे यांच्या सह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्व मतदारांचे, सहकारी मित्र व मार्गदर्शक यांचे भास्कर कोकणे यांनी आभार मानले होते. परंतु आज 20 मार्चला श्रावण पा. भिलवंडे यांनी व समर्थकांनी फेर मतमोजणीत मिळालेल्या यशाचा जल्लोष साजरा केला. परंतु निर्णय स्पष्ट झाला किंवा नाही याची खात्री पनल प्रमुखांनाच माहीत…..! यावेळी कसल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी रामतीर्थ पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार शिवराज नरवाडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य राखीव पोलीस दल यांच्या सह , नरसी बिट जमादार सुर्यवंशी, शिंदे,बोडके यांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली होती.


