सदानंद पुरी
शहर प्रतिनिधी माहुरगड
माहुर….. नंदू शेषेराव दाळके
पेसा समिती अध्यक्ष पाचोंदा व
सपना मुंगशीराम शेडमाके
पेसा समिती सदस्य यांनी केली आहे
तालुक्यातील मौजे पाचुंदा ता. माहूर येथील पेसा अंतर्गत गाव असल्यामुळे पेसा या खात्यामध्ये एकुण रक्कम १.९७,३९८/-रु. एवढी रक्कम होती. त्यापैकी आम्ही दोघे अध्यक्ष व सदस्य ६५,०००/-रु च्या चेक उचल करण्यासाठी चेक वरती सही केली. आमच्याकडे तीन चेक पैकी पहिला चेक २०,०००/-रु अविनश विश्वनाथ तोरकर, दुसरा चेक आनंदा फरिदा पवार-२०,०००/-रु, तिसरा चेक मेघराज हरसिंग जाधव-२५,०००/ रु. सदरील चेक घेऊन आमच्याकडे अविनाश विठ्ठल गाडे, दादाराव महादु तोरकड हे दोघे आले होते. अंगनवाडी साहित्य खरेदी करण्या करीता आम्ही सदरील चेक वरती सह्या केल्या. गाव पेसा समितीच्या सांगण्यवरुन आम्ही एस. बी.आय. बँकेचे स्टेटमेन्ट काढले असता त्यामध्ये केवळ १२,३९८/-रु.आढळून आले. सदरील स्टेटमेन्ट मध्ये दोन चेक आमच्या दोघांच्या खोट्या सह्या करुन १,२०,००० /- रु. रोख रक्कम उचल केल्याचे आढळुन आले. सदरील स्टेटमेन्ट मध्ये राजेश बाबुराव कड यांच्या नावे १,००,०००/- रु. व दूसरा चेक प्रमोद लालसिंग रा – २०,०००/-रु दिल्याचे आढळुन आले. हे दोन्ही व्यक्ती आमच्या गावातील रहिवासी नसुन ग्रामसेवक व सरपंच या दोघांच्या सहमतीने सदरील व्यक्तींना पेसा समिती अध्यक्ष व सदस्य आमचे चेक वरती सही न घेता ग्रामसेवक व सरपंच यांनी आमची खोटी सही करुन या दोन व्यक्तीना चेक दिले. त्या चेक घेणारे दोन व्यक्तींनी गावामध्ये कोणते कामे केली किंवा पैसे कोणाला उचलुन दिले, बँके मध्ये पैसे उचल करतांना या दोन व्यक्ती सोबत पाचोंदा येथील कोणती व्यक्ती किंवा सदस्य होती यांची बँकेची सि.सि.टी.व्ही. चेक करण्यात यावी किंवा पैसे बँकेच्या बाहेर कोणत्या व्यक्तीला आनुन दिले त्याची चौकशी करण्यात यावी. पेसा समिती चे चेक बुक आमच्या कडे नसते. चेक बुक ग्रामसेवक व सरंपच यांच्याकडे असते. करीता मा. साहेबांनी राजेश बाबुराव कड व प्रमोद लालसिंग रा याची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करावी ही विनंती नंदू शेषेराव दाळके पेसा समिती अध्यक्ष पाचोंदा सपना मुंगशीराम शेडमाके पेसा समिती सदस्य यांनी केली आहे


