कैलास श्रावणे
जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ
यवतमाळ : भिम टायगर सेना, वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभेचे शासनास निवेदननवी दिल्ली येथे केंद्र सरकारच्या वतीने हिवाळी अधिवेशन सुरू असताना लोकशाहीच्या सर्वात मोठ्या भारतीय संसदेत संबोधित करताना भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी एकेरी शब्दात आंबेडकर, आंबेडकर, आंबेडकर भारताच्या भाग्य विधातांचा उल्लेख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केल्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जाणीवपूर्वक अपमान केला.त्यांच्या याकृती विरोधात पुसद येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा येथे भिम टायगर सेना, वंचित बहुजन आघाडी,व भारतीय बौद्ध महासभा तथा विविध सामाजिक संघटनेच्या वतीने भव्य धिक्कार निषेध निदर्शन करण्यात आली तसेच त्यांच्या राजीनाम्याचि व समस्त समाज बांधवाची माफी ची मागणी करण्यात आली. सदर मागण्याचे निवेदन नायब तहसिलदार गणेश कदम यांना देण्यात आले या वेळी भीम टायगर सेनेचे किशोर कांबळे, वंचित बहुजन आघाडीचे बुद्धरत्न भालेराव,भारतीय बौद्ध महासभेचे भारत कांबळे, युवा कार्यकर्ता सनी पाईकराव, विशाल डाके, मधुकर सोनवणे, माजी जि प सदस्य सुरेश धनवे,मधुर खिल्लारे ,अमोल खंदारे प्रभाकर खंदारे, विद्या नरवाडे, सोनिया कांबळे, शोभा खंदारे, जनाताई भगत सीमा असोले, विमल कांबळे स्मिता बलखंडे, निर्मला दुथडे इत्यादी महिला कार्यकर्त्या सह असंख्य बौद्ध बांधव विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ता पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पोलीस विभागाच्या वतीने तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.