सिध्दार्थ कांबळे
ग्रामीण प्रतिनिधी बिलोली
बिलोली : तालुक्यातील बामणी येथील शेतकऱ्यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी रोख ५० हजार रुपये घेऊन बँकेत ठेवण्यासाठी जात असताना अचानक चोराने हातातील पिशवीला हिसका मारून पळ काढल्याने बिलोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
बिलोली पोलिसांनी फिल्मी स्टाईलने चोरांना पाठलाग करून बेड्या ठोकण्यात आले.
सविस्तर वृत्त असे आहे की दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी फिर्यादी नामे नागोराव पिराजी भरांडे वय ६० वर्ष रा. बामणी ता. बिलोली यांनी बिलोली पोलीस स्टेशन येथे स्वतः जाऊन फिर्याद दिली असून, दि. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी ०१.३० वा सुमारास रुपये ५०,०००/- रुपये आपल्या मुलीच्या लग्नासाठी बिलोली येथील ग्रामीण बँकेमध्ये पैसे जमा करण्यासाठी घेवुन जात असतांना शिवाजी पुतळयासमोरील एका ऑटो रिक्षामधील व्यक्तींनी नमुद फिर्यादीचे रुपये ५०,०००/- पैसे चोरुन नेले बाबत पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नंबर ३२६/२०२४ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा मा.पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार,अप्पर पोलीस अधिक्षक श्री सुरज गुरव,अप्पर पोलीस अधिक्षक श्री खंडेराव धरणे,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रफिक शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चालू होता.सदरील गुन्हयाच्या तपासामध्ये तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गोपनीय यंत्रणेच्या आधारे काल दि. ०३ नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी नमुद गुन्हयातील आरोपी हे बिलोली शहरामधुन नर्सी नायंगाव कडे त्यांच्या ताब्यातील रिअर ऑटोमध्ये जात आहेत अशी खात्रीशीर माहीती मिळाल्याने मा.पोलीस निरीक्षक श्री अतुल भोसले यांच्या आदेशाने बिलोली पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर शिंदे, पो.हे.कों/२३५१ मारोती मुददेमवार,पो.हे कॉ/ ७१९ सुनिल दस्तके, पो.शि./३५४ व्यंकट घोंगडे, पो.कॉ/१७२२ लक्ष्मण बच्चेचार असे स्टाफसह सदर ऑटोचा फिल्मी स्टाईलने पाठलाग करुन त्यांना चिंचाळा पाटी येथे ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्यांना ऑटोसह ताब्यात घेवुन सदर गुन्हयासंबंधाने बिलोली पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांना गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. तसेच नमुद गुन्हयातील आरोपीतांची नावे १) गौस बेग रफिक बेग वय २८ वर्ष व्यवसाय बेकार रा. वर्क शॉप,निझाम कॉलनी,नांदेड २) सुरज बापुराव कांबळे वय २४ वर्ष व्यवसाय ऑटो चालक रा.गौतम नगर,सांगवी बु. नांदेड अशी आहेत. तसेच त्यांनी सदर गुन्हयामध्ये त्यांच्या ताब्यातील रिअर ऑटो एम.एच २६ बी.डी ६८०५ हा वापरला असल्याची कबुली दिली. नमुद आरोपीतांच्या ताब्यातुन १) एक काळया रंगाचा रिअर ऑटो क्रमांक एम. एच २६ बी.डी ६८०५ किंमती २,००,०००/- व नगदी रक्कम १९,०००/- रुपये असा एकुण २ लाख १९ हजार रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आलेला आहे. नमुद गुन्हयातील आरोपी हे सध्या पोलीस कोठडीमध्ये असुन त्यांच्याकडे गुन्हयासंबंधाने अधिक विचारपुस व तपास चालु आहे. सदर चोरीचा गुन्हा हा मा. पोलीस अधिक्षक श्री अबिनाश कुमार साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्री सुरज गुरय साहेब, अप्पर पोलीस अधिक्षक श्री खंडेराव धरणे साहेब, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रफिक शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषणाच्या व गोपनीय यंत्रणेच्या साहय्याने उघडकीस आणण्यात आलेला असुन सदर गुन्हयामध्ये बिलोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील सहा.पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर शिंदे, पो.हे.कों/२३५१ मारोती मुददेमवार, पो.हे.कों/ ७१९ सुनिल दस्तके, पो.शि./३५४ व्यंकट घोंगडे,पो.कों/१७२२ लक्ष्मण वच्चेवार यांचा समावेश होता.