शरद भेंडे
तालुका प्रतिनिधी अकोट
अकोट : पोपटखेड रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत तर या रस्त्यावर भरधाव वेगाने गौण खनिज भरुन टिप्पर धावत आहेत.अशातच दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ८ ते ८.३०च्या सुमारास अकोट वरून पोपटखेड इथे आपला उदरनिर्वाह करण्यासाठी दुकानचे सामान घेऊन मोटरसायकलने जात असलेल्या ३३वर्षीय महंमद नाझीम अब्दुल मजीद राहणार पोपटखेड हल्ली मुक्काम शाईन कॉलनी अकोट याच्या मोटरसायकल क्र. MH 30 AQ 3701 ला पोपटखेड वरून अकोट कडे ओव्हरलोड गौण खनिज भरून भरधाव जात असलेल्या टिप्पर क्र. WB 39 A 9033 याने जोरदार धडक दिल्याने मोटर सायकल स्वार जागीच ठार झाला आहे सदर ह्या मार्गावर लक्झरी बस व टिप्परचा सुद्धा अपघात काही दिवसांपूर्वी झाला होता.सदर टीप्पर चालकांची नियमित मेडिकल चाचणी करणे आणि त्यांचे फिटनेस प्रमाणपत्र असणे हे महत्त्वाचे आहे तसेच हि टीप्पर मालकांची जबाबदारी आहे.आणी या टिप्परवर नियमबाह्य आणि अप्रशिक्षित लोकांना कमी पगारावर ड्रायव्हर म्हणून कामावर ठेऊन हे टीप्पर मालक स्वतः च्या फायद्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळतात, यावर काही तरी उपाय योजना शासनाने करावी तसेच लोड असलेल्या टीप्परच काही तरी करावे कारण पोपटखेड अकोट मार्गावर
काही टीप्परवर जे ड्रायव्हर आहेत ते नाबालिक आहेत तसेच त्यांच्या कडे कोणत्याही प्रकारचा मोटार वाहन चालविण्याचा परवाना सुद्धा नाहीत.तसेच काही टीप्परची मर्यादा संपल्यावर सुद्धा अशाच प्रकारचे टिप्पर या मार्गावर भरधाव वेगाने धावत आहेत.याकडे अकोला जिल्हा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याने व अकोट तालुका महसूल अधिकारी यांचे सुध्दा दुर्लक्ष असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघाताची मालिका सुरू आहे.अकोट पोपटखेड मार्गावर भरधाव टिप्पर ने पोपटखेड येथील दुकानदार नाझीम मोटरसायकल स्वार युवकाला उडविले.असुन त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तसेच अनेक टिप्परांना नंबर सुद्धा नाहीत त्याचप्रमाणे एका नंबरच्या दोन दोन टिप्पर असल्याचे समजते. तसेच काही टिप्पर अवैधरित्या गौण खनिज वाहतूक करीत असल्याचे सुद्धा समजते.सदर टिप्पर अकोट ग्रामीण पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले असुन अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन ला अपराध क्रमांक 523/ 2024 कलम 281, 106 (1), 324 (4)भा. न्या.सहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.