भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
पालघर जिल्ह्यातील निकणे, पिंपळशेत, शेल्टी, रानशेत, वधना, ब-हाणपुर यासारख्या आदिवासी बहुल गावांमध्ये जिओ नेटवर्कची समस्या वाढली आहे. गेल्या आठवड्यापासून या भागांमध्ये जिओ टॉवर असूनही नेटवर्क येत नसल्यामुळे जिओ ग्राहकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे.
ग्राहकांचा रोष:
जिओ ग्राहकांने महागडे रिचार्ज करत असूनही चांगल्या सेवा मिळत नसल्याची तक्रार करत आहेत.
नेटवर्कच्या समस्येमुळे संपर्क तुटतो, तसेच डिलिटल काळात सर्व ऑनलाईनचे काम ठप्प झाल्याचे निदर्शनास येते. तर अनेक वेळा “नेटवर्क क्षेत्राबाहेर आहे” असे सांगण्यात येते.
इंटरनेटचा वेग खूपच कमी असल्यामुळे शैक्षणिक आणि व्यावसायिक कामांवर परिणाम होत आहे.
आरोग्य आणि कामावर प्रभाव:
रुग्णालयांमध्ये असलेल्या रुग्णांशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत.
रोजंदारी करणाऱ्या मजुरांना सकाळी कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतरच नेटवर्कचा उपयोग करता येतो, हे खूपच गैरसोयीचे ठरत आहे.
जिओ ग्राहकांची मागणी:
गावकऱ्यांनी या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन कंपनीने लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे. नेटवर्क टॉवरची तपासणी करून सेवा सुरळीत करण्यात यावी.
जर ही समस्या तत्काळ सोडवली नाही, तर स्थानिक प्रशासनासोबत जिओ कंपनीलाही जबाबदार धरले जाईल, अशी भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
कोट:
मागील आठवड्यापासून जिओचे नेटवर्क नसल्यामुळे मोबाईलवरून समोरील व्यक्तीला आवाज जात नसल्यामुळे संपर्क होत नाही. तसेच, जिओचे नेटवर्क मिळत नसल्यामुळे ऑनलाईन कोणतीही कामे होत नाहीत. रिचार्जचे दर वाढविलेले असताना व वेळेवर रिचार्ज करूनसुद्धा नेटवर्कची समस्या असेल तर ही ग्राहकांची जीओ कडून केवळ आणि केवळ फसवणूक आणि लूटमार सुरू आहे.
- जितू रामदास घाटाळ, निकणे – जिओ ग्राहक