अरविंद बेंडगा तालुका प्रतिनिधी, तलासरी
तलासरी :- तलासरी येथील कोचाई भागात मुंबई बडोदरा एक्सप्रेस वे च्या कामात प्रकल्प बाधितांचे आंदोलन दोन दिवसापासून आंदोलन सुरू, प्रचंड पोलीस बंदोबस्तात प्रशासन देखील तत्पर डहाणू,तलासरी तालुक्यातील कोचाई हद्दीतील साधारण दोन वर्षापासून रखडलेल्या मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाच्या कामाला सोमवार २ डिसेंबर रोजी मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरुवात करण्यात आली आहे,कोचाई हद्दीत जमीन अधिग्रहण प्रक्रियेत प्रकल्प बाधितांना योग्य मोबदला मिळाला नसल्याचे कारण पुढे करत याठिकाणी स्थानिकांनी काम बंद पाडले होते. दरम्यान सोमवारी प्रशासनाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात कामाला सुरुवात केली आहे,मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गासाठी अधिग्रहित केलेल्या जमिनींमुळे महामार्गाचे काम नेहमीच चर्चेत राहिले आहे. पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण आदिवासी भागात बहुतेक जमिनींचे मालक, कुळ वहिवाट आणि कब्जेदार वेगवेगळे असल्यामुळे जमिनीचा मोबदला देण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या. कोचाई हद्दीत जमिनीच्या मोबदल्याबाबत तिढा निर्माण झाल्यामुळे स्थानिकांनी दोन वर्षांपासून काम थांबवून ठेवले होते. दरम्यान सोमवारी स्थानिक प्रशासनाने मोठ्या पोलीस बंदोबस्तात कोचाई येथे पात्र प्रकल्प बाधितांना मोबदला देत कामाला सुरुवात केली आहे,पोलीस बंदोबस्तात सुरू असलेल्या कामाला काही स्थानिकांनी विरोध केला असून वर्षानुवर्षे जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना डावलून जमिनीचा मोबदला वाटप केल्याचे आरोप भुमिसेना आणि आदिवासी एकता परिषद या संघटनांकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी संघटना आणि संबंधित प्रशासनाची वेळोवेळी बैठकी घेऊन चर्चासत्र सुरू असताना शासनाने जबरदस्तीने प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न केला असून काही स्थानिक आदिवासी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक केल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात येत आहेत,मुंबई वडोदरा द्रुतगती प्रकल्पात65 बाधीत जागांच्या मोबदल्यावरुन डहाणू आणि तलासरी तालुक्यात अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या होत्या. या भागात जमीन मालक आणि प्रत्यक्ष जमिनी करणाऱ्या शेतकऱ्यांचे दोन गट निर्माण झाले असून मोबदला देताना अडचण निर्माण होत आहेत. दरम्यान शासनाने सातबारा धारकाला ६०% आणि कुळ वहिवाट धारकाला ४०% मोबदला देण्याचे सूत्र राबवून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही भागात जागा मालक, कुळ वहिवाट आणि प्रत्यक्ष कब्जेदार असा तिढा असल्यामुळे वाद निर्माण झाले आहेत,पोलिसांचा बंदोबस्त कोचाई येथे प्रकल्पाचे काम सुरू करताना कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने शासनाने पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती. त्यानुसार याठिकाणी उपविभागीय पोलिस अधिकारी डहाणू अनिल लाड, तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय मुतडक यांच्यासह ८ पोलीस अधिकारी, मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त देण्यात आल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून कडून देण्यात आली आहे,कोट – शासनाकडून जबरदस्तीने आदिवासींच्या जमीन अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. कोचाई हद्दीत वडिलोपार्जित जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना डावलले गेले आहे. शासनाने जबरदस्ती थांबवून आदिवासी शेतकऱ्यांना त्यांचा योग्य मोबदला द्यावा यासाठी भूनिसेना आणि आदिवासी एकता परिषद प्रयत्न करत आहे. – दत्ता करबट, भूमी सेना, आदिवासी एकता परिषद कोट – कोचाई हद्दीत प्रकल्पाच्या कामात बाधित जमिनीचा मोबदला पात्र बाधितांना देण्यात आला आहे. सोमवारी आम्ही प्रत्यक्ष गावात जाऊन पात्र लाभार्थ्यांना मोबदला वाटप केले असून काही लोकांकडून निष्कारण विरोध होत असल्यामुळे पोलीस बंदोबस्त घेण्यात आला आहे. – सत्यम गांधी, सहाय्यक जिल्हाधिकारी, डहाणू.कोट येथील बाधित नागरिकांना घर झाड व जागेचे मोबदले मिळाले नसून प्रशासनाने दडपशयने काम सुरू केले आहे त्यामुळे बाधितग्रस्त आंदोलन करीत आहेत. प्रशासनाने दडपशाहीने हे काम जरी पूर्ण केले महामार्ग सुरू जरी झाला तरी तो आम्ही रोखू शकतो. मोबदला मिळत नाही तिथपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार. भरत वायडा सचिव भुमिसेना