अरविंद बेंडगा तालुका प्रतिनिधी, डहाणू
डहाणू :- आर्थिक समावेशन ही एक महत्त्वाची जागतिक समस्या आहे आणि लाखो व्यक्तींना अजूनही मूलभूत वित्तीय सेवांमध्ये प्रवेश मिळाला नाही. म्हणून ग्रामीण समुदायांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्यासाठी मेलजोल संस्था डहाणू आणि विक्रमगड येथे ‘ग्रामअर्थ’ कार्यक्रमाच्या माध्यमातून, तरुणांना उत्प्रेरक म्हणून स्थान देतो आणि आर्थिक ज्ञान, वृत्ती, वर्तन, आणि प्राथमिक उद्दिष्टांचे पालन करण्यासाठी हस्तक्षेपांचा केंद्रबिंदू म्हणून मुलांमध्ये पाया तयार करतो. तसेच आर्थिक समावेशन,शैक्षणिक क्रियाकलाप, जागरूकता मोहिमा आणि ड्राइव्ह, डिजिटल आर्थिक शिक्षण यांच्या संयोजनाद्वारे मेलजोल सोई सुविधा नसलेल्या मुले आणि तरुणांना सशक्त बनविण्याचे आणि त्यांच्या आर्थिक संसाधनांमध्ये प्रवेश सुलभ करण्याचे उद्दिष्ट ठेवतो. म्हणून आज दिनांक ३ डिसेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद शाळा धानीवरी येथे जण सेवा सुविधा शिबिराचे आयोजन केले होते. त्यामध्ये शाळेतील शिक्षक, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, मेलजोल प्रतिनिधी उपस्थित होते. शिबिरात शाळेतील मुले- ६४५ आणि गावातील युवक १२२ आणि पालक -२३३ यांनी लाभ घेतला, तसेच त्या ठिकाणी,श्रीमती सुरेखा तांबडा-ग्रामपंचायत धानिवरी उपसरपंच, श्री.चौघुले सर- जि.प. शाळा देवूर गेठीपाडा, श्री. कृष्णा झुंगरे सर – मेल जोल संस्था प्रोग्राम मॅनेजर- पालघर , श्री. नितिन पागी मेल जोल संस्था प्रोग्राम समन्वयक श्री. दिलीप कोरडा मेल जोल संस्था प्रोग्राम प्रशिक्षक व समन्वयक तसेच शिक्षक वर्ग व मेलजोल टीम उपस्थित होते,उपसरंच ग्रा. पंचायत धानिवरी- तांबडा मॅडम,आमच्या गावात मेलजोल संस्था काम करत आहे याचा आम्हाला आनंद आहे. आमच्या गावातील मुले आणि युवक यांना सशक्त बनवून आर्थिक समावेशनात आणण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देतात आज संस्थेने जन सुविधा शिबिर राबल्या बद्दल खूप आभार.


