मारोती बारसागडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी
चामोर्शी तालुक्याच्या सीमेवर वसलेल्या हरणघाट येथील मुरलीधर महाराज यांच्या वतिने २१ ते २६ नोव्हेंबरपर्यंत काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात विविध गावातील भाविकांना २ लाख ३ हजारांची देणगी व जीवनावश्यक वस्तुंचे दान केले या वस्तु व रक्कम चपराळा येथील देवस्थाचे अध्यक्ष संजय पंदिलवार, सचिव रामचंद्र बामणकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या मुरलीधर महाराज यांनी गेल्या दहा वर्षापासून पालखी सोहळ्याची परंपरा कायम राखली आहे यावर्षी २१ ते २६ नोव्हेंबरपर्यंत पालखीसोहळ्याचा कार्यक्रम संत मुरलीधर महाराज यांनी आयोजित केला पालखीसोबत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले पालखीला मुरलीधर महाराज स्वत: हजर राहुन हरणघाट ते चपराळा पायी चालत ही पालखी हरणघाट, घारगाव, रामाळा , मोहुली, फराळा, मर्कंडादेव, चाकलपेठ, मुरखळा, कान्होली हेटी, बोरी भिक्षी, जयरामपुरा, किष्टापुर, सेलुलर, लक्ष्मणपुर, मुधोली, कढोली,उमरी,अनखोडा,आष्टी, इल्लुर, फाकरी, कुनघाडा अशा विविध गावातुन मार्गक्रमण केली त्या गावात पालखीची आरती महाप्रसादचे आयोजन करण्यात आले २६ नोव्हेंबर रोजी चपराळा येथील पालखी पोहोचाली तिथेही आरती पूजाअर्चा आदि धार्मिक कार्यक्रम पार पडला दरम्यान विविध गावातुन काही दान-धर्म अन्न धान्य गोळा केला ते सर्व गुरूच्या चरणी परमपुज्य संत मुरलीधर महाराज यांनी अर्पण केले यावेळी सर्व गावातुन देणगी स्वरूप रक्कम दोन लाख तीन हजार रुपये एवढे दान प्राप्त झाले २० पोती तांदुळ एक पोते गहु आणि अर्धा पोते डाळ हे सर्व गुरुचे मंदिर चपराळा देवस्थानात अध्यक्षांच्या हस्ते समर्पित करण्यात आले शिष्यांनी गावो त्यातच मला माझ्या भाविकांना आनंद होत आहे म्हणून ही परंपरा आजही कायम ठेवली आहे अशी माहिती संत मुरलीधर महाराज यांनी व्यक्त केली हरणघाट मंदिर प्रशाहनाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.