प्रशांत मुनेश्वर शहर प्रतिनिधी नांदेड
3 डिसेंबर हा जागतिक दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच धर्तीवर शासनाच्या विविध योजना कार्यक्रम, कृती आराखडे दिव्यांगांच्या विकासासाठी राबविले जात असल्याबाबत जाहिरात बाजू खूप मोठ्या प्रमाणात केले जात असून, जागतिक दिव्यांग दिनाच्या दिवशी, दिव्यांगांना स्वतःच्या आता अधिकारासाठी विविध योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने शासन दरबारी वेळोवेळी हेलपाटे मारावे लागत असल्याचा चर्चा व स्वतःचे अनुभव सांगताना दिव्यांग बांधव दिसून आले.दिव्यांगांसाठी असलेला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, यांच्याकडे, दिव्यांगांसाठी पाच % निधी खर्च करण्याचा कायदा असताना देखील शासन स्तरावरून दिव्यांगांच्या निधीचा खर्च न करता, तो निधी अखर्चित ठेवला जातो. त्यामुळे दिव्यांगांच्या शैक्षणिक सामाजिक आर्थिक उत्कर्षासाठी शासनाने सर्वतोपरी प्रयत्न करावे व बच्चू कडू यांचे पुनर्वसन करावे इत्यादी प्रमुख मागण्यासाठी आज दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी नांदेड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विविध, दिव्यांग संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आक्रोश मोर्चा व जन आंदोलन करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व डाखोरे पाटील, राहुल साळवे, त्याचबरोबर जमलेल्या सर्व दिव्यांग बांधवांनी केले.


